२०१४ च्या लोकसभा - विधानसभा निवडणूका पार पडल्या, पण आघाडीला फारसं यश मिळालं नाही. २०१९ सालच्या निवडणुकीसाठी आम्ही त्यावेळीपासूनच कामाला लागलो होतो. एके दिवशी माझ्या कार्यकर्त्यांच्या समुहाने मला राजू शेट्टींना आघाडीत समाविष्ट करुन घेण्याची विनंती केली. त्यानंतरच राजू शेट्टी यांना आघाडीत सामील करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली, राजू शेट्टी ज्या पक्षापाठी राहतात त्या पक्षाची सत्ता येते, हा माझा अनुभव आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
माझ्या गोविंदबागेसमोर माझ्याविरोधात आंदोलन करुनही आज मला त्यांच्याबद्दल आदर आहे. हे सांगत असताना त्यांनी "राजू शेट्टींना आमदार पद देणारा मी कोण ?" असे गौरवोद्गार केले. २०१९ ची विधानसभा निवडणूक राजू शेट्टी यांच्यामुळेच आम्ही जिंकू शकलो असं ही ते पुढे म्हणाले. राजू शेट्टींनी पश्चिम महाराष्ट्रात सहकारामध्ये विशेषत: ऊसपट्यात यशस्वी आंदोलन केले, त्यांनी केलेले आंदोलन आमच्या सरकारविरोधात असायचे पण त्यांच्याबद्दल आमचा आदर वाढतच गेला. राजू शेट्टींमुळे आघाडीचे ३० ते ४० आमदार निवडून आले,त्यांना आमदार करणारा मी कोण ? हे बोलायला ही ते विसरले नाहीत.
२०१४ मध्ये भाजपची सत्ता आणण्यात सुद्धा राजू शेट्टींचा हात होता, पण जिथे पिकते तिथे विकले जात नाही. पवार पुढे म्हणाले, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, याउलट सदाभाऊ-शेट्टी ही शेतक-यांची जोडी फोडण्याचे पाप केले, यातूनच राजू शेट्टी यांच्या प्रामाणिकपणाची चाहूल लागली होती. शेवटी २०१९ मध्ये आम्हाला त्यांचे मन वळवण्यात यश आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणखी पदे देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खुलासा त्यांनी केला.
राजू शेट्टींची आमदारकी ही कोणात्याही पक्षाच्या कोट्यातून नसून, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी राजू शेट्टी हे एक असतील. आघाडीकडून ही जागा सामाजिक कार्य करणा-या राजू शेट्टींना देण्यात येणार आहे, यामध्ये कोणत्याही पक्षाचा कोटा नसतो, आघाडीने राजू शेट्टींचे नाव या १२ आमदारांमध्ये सुचवले आहे...

भाजपच्या एका चुकीमुळे राजू शेट्टींसारखे नेतृत्व आघाडीमध्ये आणण्यात यश आले - शरद पवार
२०१४ मध्ये भाजपची सत्ता आणण्यात सुद्धा राजू शेट्टींचा हात होता, पण जिथे पिकते तिथे विकले जात नाही. पवार पुढे म्हणाले, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, याउलट सदाभाऊ-शेट्टी ही शेतक-यांची जोडी फोडण्याचे पाप केले, यातूनच राजू शेट्टी यांच्या प्रामाणिकपणाची चाहूल लागली होती. शेवटी २०१९ मध्ये आम्हाला त्यांचे मन वळवण्यात यश आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणखी पदे देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खुलासा त्यांनी केला.
राष्ट्रवादीच्या कोट्यातून नाही तर राज्यपाल कोट्यातून राजू शेट्टी आमदार