शिवराज्याभिषेक_दिन 'राष्ट्रीय सण' म्हणून साजरा झाला पाहिजे: संतोष शिंदे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

Sambhaji Briged
धनकवडी - आज ३४६ व्या 'शिवराज्याभिषेक' दिना निमित्त धनकवडी येथील 'भारती विद्यापीठ परिसरात' छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळा हा मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला जावा इतका ऐतिहासिक क्षण आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याने खऱ्या अर्थाने पारतंत्र्यात खितपत पडलेल्या जनतेला स्वातंत्र्याचा उश:काल बघायला मिळाला. शेकडो वर्षापासून गुलामगिरीच्या साखळदंडानी जखडलेल्या भारतीय जनतेला या प्रसंगामुळे नवी चेतना मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हरवलेली 'भारतीय अस्मिता' पुन्हा रायगडी सिंहासनावर विराजमान झाली. या देशाला मिळालेले पहिले छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चे आहेत हा आपल्या देशाचा एक सुवर्ण क्षण असून शिवराज्याभिषेक दिन राष्ट्रीय सण म्हणून घराघरांमध्ये साजरा झाला पाहिजे.

'शिवराज्याभिषेक दिन' "राष्ट्रीय सण" म्हणून साजरा झाला पाहिजे. देशाला शिवरायांच्या विचारांची गरज आहे. शिवाजी महाराज हे बहुजन रयतेला व महाराष्ट्राला मिळेलेले पहिले 'छत्रपती' आहेत. मावळ्यांचा आज सुवर्ण दिन आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार माऊली दारवटकर व संतोष फरांदे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला...

डावीकडून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष माऊली दारवटकर, माजी नगरसेवक संतोष फरांदे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहनीश जाधव, गणेश चऱ्हाटे, पद्माकर कांबळे, विनोद चऱ्हाटे, इम्रान खान यावेळी उपस्थित होते.

करोना महामारी च्या संकटामुळे 'शिवराज्याभिषेक दिन' सोहळा धनकवडीत फिजिकल डिस्टन्सींग चे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन मोहनीश जाधव यांनी केले.

संभाजी ब्रिगेड, राष्ट्रशक्ती संघटना, राजे शिवराय प्रतिष्ठान, अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, दक्षिण पुणे व समस्त शिवप्रेमी उपस्थित होते.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.