शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवापूर येथे रक्तदान शिबीर संपन्न

Sinhagad Times शिवराज्याभिषेक दिनानिमित्त  शिवापूर येथे रक्तदान शिबीर संपन्न
विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स - आज कोरोना महामारी च्या संकटामुळे संपूर्ण देश संकटात आहे. देशामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे आपल्या देशहितासाठी अडचणीच्या काळात शिवापूर (अलंकार सांस्कृतिक भवन) येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबीराचे उद्घाटन सासवडचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून राजगड पोलीस स्टेशन चे ए.पी.आय. दत्तात्रय दराडे, पी.एस.आय समीर कदम, पी.एस.आय निखिल मगदूम हे उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये शिवगंगा खोऱ्यातील सर्व शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत रक्तदान केले.तसेच 63 शिवभक्तांनी रक्तदान केले.सदर शिबीराचे आयोजन हे ऍड. विठ्ठलराव कोंडे-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. डॉ प्रशांत दुमने, रमेश बापू कोंडे, दिगंबर नाना दिघे, संजय अण्णा दिघे, राजमुद्रा मित्रमंडळ कुसगाव, परीस युथ फाउंडेशन, राजगड पोलीस स्टेशन यांचे सहकार्य लाभले. तसेच रक्तसंचयनाचे कार्य आधार ब्लड बँक यांच्याद्वारे करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.