न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

 

Bullock-cart-race-at-Gujarwadi-near-Katraj-even-when-banned

पुणे: बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालय व राज्य सरकारने बंदी घातलेली असतानाही गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी 14 जणांवर गुन्हा दाखल केला होता. हि घटना शनिवारी  सकाळी १० वाजता कात्रजवळच्या गुजरवाडी येथे घडला. 

हे पण वाचा, सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

याप्रकरणी पोलिस हवालदार रविंद्र चिप्पा यांनी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे जिल्हयात करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही शनिवारी दुपारी आयोजन करण्यात आले होते.  त्यानूसार संतोष अशोक ननवरो(रा.कोंढवा), राहुल चौधरी, बाळासाहेब खोपडे, तात्या मांगडे, योगेश बाळासाहेब रेणूसे (२९,रा.वेल्हा), मयुर दिलीप शेवाळे, पंढरीनाथ फडके, वामन विनायक फडके(६५), हरिचंद्र भागा(५८), पदमाकर रामदास फडके (२८), ऋषीकेश सुर्यकांत, संकेश शशिकांत चोरगे(२१), यश राजू श्रिंगारे, संतोष शिवराम कुडले अशी आरोपींची नावे आहेत. 

हे पण वाचा, धायरी परिसरातील पाणीटंचाई विरोधात पाण्याच्या टाकीजवळ 'जन आक्रोश आंदोलन'

ऊच्च न्यायालय व महाराष्ट्र सरकार यांनी बैलांची शर्यत आयोजीत करणेवर बंदी आदेश केला असताना देखील यातील आरोपींनी आदेशाचा भंग करुन कायद्याचे उल्लंघन करीत कात्रज जवळच्या गुजरवाडी येथील डोंगराच्या बाजूला असलेल्या सपाट मैदानामध्ये शनिवारी सकाळी साडे नउ ते साडे दहा वाजता पंढरी फडकेसह एका व्यक्तिने बैलगाडा शर्यत भरविली होती. 

हे पण वाचा, महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

याप्रकरणी १० ते १२ जणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आदेशाचा भंग केला म्हणुन गुन्हा दाखल आहे. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक नितीन शिंदे करत आहेत. 

हे पण वाचा, खडकवासला धरणातून खरिप हंगामाचे पहिले आवर्तन ८०० क्यूसेकने सुरु



Sinhagad Times सिंहगड टाईम्स

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.