प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलवाडीचे 'विठ्ठल मंदिर' आषाढी एकादशीला बंद

 

Vitthalwadis-Vitthal Mandir-closed-on-Ashadi-Ekadashi

पुणे: सिंहगड रोडच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी आयोजित असलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखता मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल रखुमाई देव संस्थानच्या विश्वस्त मंडळानी घेतला आहे. तसेच त्याबाबत विश्वस्त मंडळाने त्या भागात फ्लेक्स लावून मंदिर बंद असल्याची जनजागृती देखील केली आहे. 

हे पण वाचा, न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विठ्ठल मंदिरात दरवर्षी आषाढी एकादशीला दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. पुणे आणि आसपासच्या परिसरातील ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक आणि वारकरी या मंदिरात दर्शनासाठी येतात. या परिसरात दरदिवशी जत्रेचे स्वरूप आलेले असते, परंतु संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. 

हे पण वाचा, सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

विठ्ठलवाडीचे विठ्ठल मंदिर हे मंदिर १७५ वर्ष जुने असून मुळा मुठा नदीच्या काठी वसलेलं आहे. अतिशय देखणा शांत असा मंदिराचा परिसर आहे. या मंदिराचा इतिहास असं सांगतो की संभाजी गोसावी नावाचे एक विठ्ठल भक्त येथे शेती करत असे. व्यवसायाने शेतकरी असलेले गोसावी न चुकता पंढरीची वारी करायचे पण वार्धक्या मुळे जाणे जमत नव्हते. याच विवंचनेत असताना एके दिवशी शेतात काम करताना त्यांचा नांगर एका ठिकाणी अडकला आणि तिथे खोदले असता साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले. हीच ती विठ्ठलाची मूर्ती. ह्या मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी काही जमीन इनाम दिली. मंदिराच्या गाभाऱ्याच्या भिंतीवर हे सनदपत्र संगमरवरी फलकावर ठळकपणे दिसेल असं लावलेले आहे. मूळ सनदेच्या नकलेवरून हा फलक तयार केला आहे. त्यावरून ह्या मंदिराचं बांधकाम इ.स. १७३२ पूर्वी झाल्याचं कळतं. 

हे पण वाचा, धायरी परिसरातील पाणीटंचाई विरोधात पाण्याच्या टाकीजवळ 'जन आक्रोश आंदोलन'

मंदिराला अगदी खेटूनच मुठा नदी वहाते आहे. हे मंदिर उंच दगडी उंचवट्यावर उभारलेलं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मंदिर अतिशय भव्य दिव्य असून लांबच लांब ओवऱ्या असलेली भक्कम तटबंदी, एकाबाहेर एक असे दोन सभामंडप आणि चौकोनी गाभारा आहे. गाभाऱ्याबाहेरच्या आतल्या मंडपाला संपूर्ण जयपूर पद्धतीच आरसेकाम केलेलं आहे.

हे पण वाचा, महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

१८४२ मध्ये मिळालेल्या ताम्रपटानुसार या मंदिराची देखभाल गोसावी कुटुंबीयांकडे आली. आजतागायत गोसावी कुटुंबीय विठ्ठलाची पूजाअर्चा करतात. गोसावी कुटुंबीयांनीच पुढे मंदिराच्या परिसरात दशावतार, महादेव मंदिर व हरिदास वेस बांधली. मंदिराच्या आवारात मारुती, गरुड आणि शनी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या प्रारंगणात मावळी पगडी मधील एक प्रतिमा आहे हेच ते संभाजी गोसावी यांचे वृंदावन स्मारक.

हे पण वाचा, खडकवासला धरणातून खरिप हंगामाचे पहिले आवर्तन ८०० क्यूसेकने सुरु


Sinahagad Times


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.