स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

 

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

पुणे: पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  जाहीर प्रवेश  केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. सदानंद शेट्टी यांचे सहर्ष स्वागत केले. त्यांच्या प्रवेशाने शहरात पक्षाला बळ मिळाले असून येत्या काळात संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय करण्याच्या दिशेने जोमाने काम करू असा विश्वास यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते, माजी महापौर अंकुशकाकडे उपस्थित होते. 

हे पण वाचा, खडकवासला धरणातून खरिप हंगामाचे पहिले आवर्तन ८०० क्यूसेकने सुरु

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शेट्टी यांनी काँग्रेस मधून भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डात काँग्रेसशी हातातोंडात आलेला विजय भाजपने हिसकावला होता. काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे कमी मतांनी पराभूत झाले होते. शेट्टी हे गेली तीस वर्षे समाजकारण ,राजकारण करीत असल्याने कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार क्षेत्रात प्राबल्य आहे. 

हे पण वाचा, धायरी परिसरातील पाणीटंचाई विरोधात पाण्याच्या टाकीजवळ 'जन आक्रोश आंदोलन'

यावेळी ज्येष्ठ नेते, माजी महापौर श्री. अंकुश (आण्णा) काकडे उपस्थित होते.


Sinhagad Times सिंहगड टाईम्स




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.