खडकवासला धरणातून खरिप हंगामाचे पहिले आवर्तन ८०० क्यूसेकने सुरु

खडकवासला धरणातून खरिप हंगामाचे पहिले आवर्तन ८०० क्यूसेकने सुरु


खडकवासला: हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील शेतीसाठीचे यावर्षीच्या खरीप हंगामातील खडकवासला धरणाच्या कालव्यातील पहिले आवर्तन सोडले आहे. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी सांगितले.

हे पण वाचा, "व्हॅक्सिन ऑन व्हील" उपक्रमाचे द्वितीय सत्र वडगाव बुद्रुक हायवे परिसरात संपन्न

यावर्षी हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यात अद्याप फारसा पाऊस पडलेला नाही. अवकाळी पाऊस एक दोन झाले आणि मान्सुन पण वेळवर आला. जुन महिन्याच्या सुरवातीला एक पाऊस झाला. त्यानंतर मात्र पाऊस गायब झाला आहे. या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. निसर्गच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कर्जत तालुक्यात पावसाअभावी सर्व पिके जळू लागली आहेत. विहिरी तलाव कोरडे पडले आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.

हे पण वाचा, धायरी परिसरातील पाणीटंचाई विरोधात पाण्याच्या टाकीजवळ 'जन आक्रोश आंदोलन'

हवेली, दौंड, इंदापूर, बारामती तालुक्यातील खरीप पिकांची पेरणी झाली आहे. सुरवातीला पडलेल्या पावसावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप बाजरी, मूग, तुर, मका यासह विविध पिकांची पेरणी केली आहे. या शिवाय तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे असून फळबागाही आहेत. या सर्व पिकांना आणि फळबागाना पाण्याची गरज आहे.

हे पण वाचा महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे

या कालव्यात पाणी सोडण्यासाठी, पानशेत मधून ५६०क्यूसेक व वरसगाव धरणातून ६०० क्यूसेक असे एक हजार क्यूसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. चार ही धरणातील सध्याच्या उपयुक्त पाणीसाठा साडेनऊ टीएमसी म्हणजे ३२.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे आवर्तन सुमारे महिनाभर सुरू राहिल. साडेनऊ टीएमसी पैकी सुमारे चार टीएमसी पाणी खरिपाच्या आवर्तनासाठी आवश्यक असते. उर्वरित साडेपाच टीएमसी पाणी पुणे शहर परिसरासाठी ठेवलेले असते. खडकवासला धरणात पुढील चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा आहे. 

Sinhagad Times सिंहगड टाईम्सटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.