महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे


 पुणे: हवेली तालुका नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शहरालगतची ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही गावे समाविष्ट करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने चार ऑक्टोबर २०१७ ला ३४ पैकी ११ गावांचा समावेश केला होता. राज्य सरकारने उर्वरित 23 गावांचा समावेश पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये केला आहे. नवीन गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर केवळ हद्दच वाढत नाही तर महापालिकेवर कामाचा भार आणखी पडला आहे.

हे पण वाचा, "व्हॅक्सिन ऑन व्हील" उपक्रमाचे द्वितीय सत्र वडगाव बुद्रुक हायवे परिसरात संपन्न

या गावांपैकी नऱ्हे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. म्हणून पाण्याचा कोटा वाढवून घेणे आणि पुरवठा सुरळीत करणे, याच बरोबर नऱ्हे गावातील घण कचऱ्याची समस्या बोकड होत चालली आहे. ग्राम पंचायतीकडून यापूर्वी दररोज घन कचऱ्याचे घंटा गाड्यांच्या मार्फत सुरली संकलन चालू होते परंतु महापलिकडे याचे नियोजन असल्याने मनमानी कारभार सुरु झाला आहे, आता घनकचऱ्याचे दोन तीन दिवसातून एकदा कचरा उचलत आहेत. अश्या अनेक समस्यांना नऱ्हे गावातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या गावात पालिकेची बस सेवा सुरू झाली असली तरी, रस्ते विकसित करणे आवश्यक आहे. 



हे पण वाचा, धायरी परिसरातील पाणीटंचाई विरोधात पाण्याच्या टाकीजवळ 'जन आक्रोश आंदोलन'

यासाठी समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या  निगडीत समस्या व मागण्यांसंबधीत आज त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी आपल्या नऱ्हेगावाच्या संबंधीत विविध मुद्यांबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली 

हे पण वाचा, प्रयेजा सिटी ते पुणे - बंगलोर हायवेला जोडला जाणारा नवीन पुल वाहतुकीस खुला

यावेळी जिल्हा परिषद सदस्या  जयश्रीताई भुमकर यांनी प्रामुख्याने पुणे जिल्हा परिषदने नऱ्हेगाव गटासाठी मान्य केलेला फंड अचानक स्थगित करून गावांवर केलेला अन्याय यावर निर्णय घ्यावा ही विनंती केली. तसेच नऱ्हेगाव हे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यामुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्यांसंबधीत पत्र ही सुपुर्त करण्यात आले. पुणे जिल्हा ग्रामिणचे संघटक सरचिटणीस श्री धर्मेद्रजी खांदरे साहेब हेदेखील सदर चर्चेसंदर्भात सकारात्मकपणे साथ देत होते. या सर्व चर्चेच्या अंती चंद्रकांत दादा पाटील यांनी सर्व समस्यांवर कोणत्याही परिस्थितीत तोडगा काढण्यात येईल हे आश्वासन दिले.

हे पण वाचा, रायकर मळा येथील बुस्टर पंम्पाचे तात्काळ काम करून धायरीतील पाणी टंचाई दूर करावी

यावेळी भा.ज.पा. खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिनजी मोरे, नऱ्हेगावाच्या विद्यमान सरपंच श्रिमती मिनाक्षीताई वनशीव, मा. सरपंच सागर भूमकर  मा. उपसरपंच सुशांत कुटे, युवा नेते तेजस कुटे आदी उपस्थीत होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.