गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण अन् ९ भाग्यवान महिलांना हेलिकॉप्टर राईड द्वारे पुणे दर्शन- सौरभ मते यांचा उपक्रम

 

गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण अन् ९ भाग्यवान महिलांना हेलिकॉप्टर राईड द्वारे पुणे दर्शन- सौरभ मते यांचा उपक्रम

खडकवासला: यंदाच्या गणेशोत्सवावर जरी कोरोनाचे संकट असले तरीही महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी खडकवासला गावाचे सरपंच सौरभ मते यांच्या वतीने गौरी गणपतीनिमित्त सजावट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल काल दसऱ्याच्या मुहूर्तावर जाहीर करुन विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. खडकवासला गावात हा बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. विशेष म्हणजे ९ भाग्यवान विजेत्या महिला भगिनींना हेलिकॉप्टर राईड द्वारे पुणे दर्शन करण्यात येणार आहे. असे सौरभ मते यांनी सांगितले. 


पूनम ताई मते आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तसेच नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित लकी ड्रॉ स्पर्धा सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेला खडकवासला परिसरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या विजेत्या महिलांना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, ओव्हन व गॅस शेगडी बक्षीस देण्यात आले तसेच लकी ड्रॉ स्पर्धेच्या 9 महिला विजेत्यांना हेलिकॉप्टर राईडचे नियोजन करण्यात आले आहे.


या वेळी काका साहेब चव्हाण - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खडकवासला विधानसभा अध्यक्ष, पूजा पारगे - सभापती महिला व बालकल्याण विभाग पुणे जिल्हा परिषद, दिपक मानकर - माजी उपमहापौर तसेच खडकवासला विधानसभा निरीक्षक, पूजा पारगे - सभापती महिला व बालकल्याण विभाग, सायली ताई वांजळे - नगरसेविका, विकासनाना दांगट - मा.नगरसेवक, समीरदादा जाधवराव - प्रगतिशील शेतकारी, सुरेश तात्या मते - नॅशनल काँग्रेस बारामती लोकसभा उपाध्यक्ष, आनंद भाऊ मते - महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, विलास अण्णा मते - माजी जिल्हा परिषद सदस्य, राहुल दादा घुले - राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अजय भाऊ मते - माजी उपसरपंच, आतुलभाऊ कारले - नॅशनल काँग्रेस खडकवासला, सचिनदादा मते - माजी उपसरपंच, अदित्य मते - उपसरपंच, अक्षय मते- तंटामुक्ती अध्यक्ष, स्नेहल कुंभार - माजी उपसरपंच, नरेंद्र हगवणे - मा.उपसरपंच, सागरभाऊ हगवणे - मा.उपसरपंच, खुशाल करंजावणे - युवा नेते तनवीरभाई शेख - अल्पसंख्याक अध्यक्ष, बापू भरेकर युवा नेते, दिपक भाऊ मते राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मुरलीधरकाका  मते, विलास तुकाराम मते सामाजिक कार्यकर्ते, भारती मते - ग्रामीण महिला उपाध्यक्षा, अतुल पवार - शेकाप, खडकवासला विधानसभा उपाध्यक्ष व खडकवासला ग्रामस्थ मित्र परिवार उपस्थित होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.