महाविकास आघाडीच्या वतीने खेड-शिवापूर परिसरात लखीमपूर खेरी हत्याकांडात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजलीखेड शिवापूर: लखीमपूर खेरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. शिवसेनाकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत आज सकाळी खेड शिवापूर, बंगला येथे आंदोलन करण्यात आले. या परिसरात बंदलाचांगला प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीच्या वतीने शंभर टक्के बंद यशस्वी झाला असल्याचे सांगण्यात आले. 


उत्तरप्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना वाहनांनी चिरडून मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व चिड आणणारा आहे. याच निर्दयी कृत्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारने सोमवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती.  आपला अन्नदाता शेतकऱ्याप्रती ऋण व्यक्त करण्याकरता व शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्या करिता महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्यासाठी महाविकासआघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने आवाहन करण्यात करण्यात आले. 


या वेळी लखीमपूर घटनेचा तीव्र निषेध करत शेतकरी हत्या प्रकरणात दोषींवर त्वरित कायदेशीर कारवाई अशी मागणी करण्यात आली. महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उस्फुर्त पणे उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.