रक्तदान शिबिराचे खऱ्या अर्थाने सार्थक, रक्ताची तातडीची गरज असणाऱ्या रुग्णाची मृत्यूच्या दाढेतून सुटका


 नर्हे: कोरेाना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा जाणवू नये कोरोनाच्या पाश्चभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जास्तीत रक्तदान शिबीर घेण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराचे सरचटणीस भूपेंद्र मोरे यांनी नर्हे भागात रक्तदान शिबीर घेण्याचा ध्यास घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी काळ १० ऑक्टोबर रोजी रक्तदान शिवबीराचे आयोजन केले होते. त्याचे उदघाटन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी १२५ रक्ताच्या बॅगांचे संकलन झाले. 


शिबिर सुरू असताना अचानकपणे समोरील क्लीनिक मधील डॉक्टर आले आणि त्यांनी रुग्णाला तातडीची गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी लगेच त्या रुग्णांसाठी दोन रक्ताच्या बॅगा उपलब्ध करून दिले. ‘कोरोना महामारीमुळे परिस्थितीमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास आलेल्या मर्यादा, नागरिकांच्या मनात असलेली भीती, कोरोनासारखी जीवघेणी परिस्थिती या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर भूपेंद्र मोरे यांनी घेतलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे. 


"आज आमच्या रक्तदान शिबिराचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले, शिबिर सुरू असताना अचानकपणे माझ्याकडे डॉक्टर आले ज्यांचे क्लिनिक शिबिराच्या अगदी समोर होते, तेथे एक रुग्ण आला ज्याच्या शरीरात फक्त ४% रक्त होते तो रुग्ण अतिशय बिकट अवस्थेत होता आणि त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती त्या डॉक्टरांनी मला प्रकार सांगितला व मला दोन पिशव्या मदत म्हणून मागितल्या लगेचच आम्ही निर्णय घेतला आणि त्या रुग्णाला रक्त पुरविले, क्षणाचाही विलंब न लावता त्याला ते रक्त देण्यात आले आणि काही वेळाने मला बातमी आली तो रुग्णाची परिस्थिती स्तिर आहे आणि मृत्यूच्या दाढेतून त्याची सुटका झालेली आहे" भूपेंद्र मोरे - सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर या वेळी प्रदेशाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रुपाली चाकणकर ,खडकवासला विधानसभा अध्यक्ष मा. काकासाहेब चव्हाण, ललिता कुटे पंचायत समिती सदस्या हवेली, निरीक्षक खडकवासला मतदार संघ मा. दीपक मानकर, महिला अध्यक्षा खडकवासला मतदार संघ मा. भावना पाटील माजी सभापती पंचायत समिती मा. प्रभवती भूमकर, माजी नगरसेवक विकासनाना दांगट पाटील, उपाध्यक्ष पुणे शहर मा. स्वाती पोकळे, धायरी माजी सरपंच विकास कामठे, सुरेखा दमिष्टे,  नऱ्हे गावचे माजी सरपंच पोपटराव खेडेकर, पालीताई पाटील, सूनिता डांगे, माझे सहकारी शरद दबडे, कुणाल पोकळे, प्रतीक पोकळे, संतोष चाकणकर, प्रदीप कुटे, युवराज सोनार, प्रशांत मते आदी मान्यवर उपस्थित होते. 
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.