‘‘संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’’ रुपाली चाकणकरांचं जोरदार प्रत्युत्तर

 


पुणे:
लखीमपूर हिंसाचारा निषेध म्हणून आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात सर्व ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान नेहमीच ट्विट करून चर्चेत राहणाऱ्या अमृता फडणवीस यांनी संधी न सोडता  आज वसुली सुरु आहे की बंद? असा खोचक सवाल करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी  जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. 


महाविकास आघाडीच्या आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस आणि रुपाली चाकणकर पुन्हा आमनेसामने आल्या आहेत.लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरही अमृता फडणवीसांनी टीका केलीय. आज वसुली सुरु आहे की बंद? असा खोचक सवाल करत महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न अमृता फडणवीस यांनी केला.


अमृता फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असं ट्वीट चाकणकर यांनी केलंय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.