"अजित पवार तुरूंगात जाणार हा केवळ एक शब्दप्रयोग" पिंपरी चिंचवडमध्ये किरीट सोमय्या यांचा यू-टर्न

 

"अजित पवार तुरूंगात जाणार हा केवळ एक शब्दप्रयोग" पिंपरी चिंचवडमध्ये किरीट सोमय्या यांचा यू-टर्न    In-Pimpri-Chinchwad-Kirit-Somaiya-changed-words-about-Ajit-Pawar

पिंपरी: महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. या सरकारमधील निम्मे मंत्र्यांना तुरुगांत टाकणार. त्यांच्याविरुद्धचे भ्रष्टाचाराचे पुरावे मी तपास यंत्रणांना देणार, असे दावे किरीट सोमय्या हे नेहमीच करत आले आहेत. त्यात अजित पवार यांना तुरुंगात टाकण्याबाबतही त्यांनी विधान केले होते. याबाबतच आज पत्रकारांनी सोमय्या यांना प्रश्न विचारला. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे अजित पवार तुरुंगात जाणार का, असे विचारले असता माझ्या वाक्याचा तुम्ही शब्दश: अर्थ घेऊ नका. अजित पवार तुरुगांत जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. बोलताना आपण तसं बोलत असतो. मात्र, त्यांच्यावर कारवाई होणार असे मला म्हणायचे आहे, असे सोमय्या यांनी नमूद केले. सर्वांनाच तुरुंगात टाकणं शक्य नसून कारवाई मात्र नक्की होणार, असेही सोमय्या यांनी नमूद केले.


किरीट सोमय्या रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी ‘‘अजित पवार यांना तुरूंगात टाकणार, अशी टीका आपण करता. त्यांना अजून काही तुरूंगात टाकले नाही. भाजपचाच अजित पवारांना पाठिंबा आहे का?’’ या प्रश्नावर सोमय्या म्हणाले, ‘‘तुरुंगात जाणार या वक्तव्याकडे शब्दप्रयोग म्हणून पाहावे. तुरुंगात जाणे म्हणजेच कारवाई होणे आणि अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझं कौतुक तरी करा, उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही, ’ असे सोमय्या यांनी म्हटले आहे.


दरम्यान, सोमय्या यांना शिवसैनिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. भाजप कार्यालयाबाहेर सोमय्या यांना काळे झेंडे दाखवण्यात आले तसेच निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.