जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत धायरीतील मल्हार गड खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा पहिला टप्पा पार

Tree-planting-in-Khandoba-temple-area-in-Dhayari-on-the-occasion-of-World-Environment-Day

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एनपीसी संस्था, संस्कृती फाउंडेशन व सिंहगड ट्रेकर्सचा उपक्रम

 पुणे: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एनपीसी संस्था, संस्कृती फाउंडेशन व सिंहगड ट्रेकर्स परिवार यांच्या वतीने धायरी येथील मल्हार गड खंडोबा मंदिर आणि नारायणराव सणस विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आठ ते दहा फूट उंचीचे वड, पिंपळ, कादंबा, कांचन, सोनचाफा, कारंज, सप्तपर्णी आदी देशी वृक्षांची लागवड केली.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत धायरीतील मल्हार गड खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण
धायरीतील मल्हार गड खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण करताना एनपीसी संस्था, संस्कृती फाउंडेशन व सिंहगड ट्रेकर्सचे पदाधिकारी

यावेळी एनपीसी संस्थेचे अमित शहा, संजय मंडोत, करण उथरा, यासीन देसाई, सिंहगड ट्रेकर्सचे चंद्रशेखर पोकळे पाटील, स्वप्निल लहानमगे, जर्नादन भुमकर, महेश भिसे, संतोष लक्ष्मण पोकळे (माजी पंचायत समिती सदस्य), अतुल काकडे, अर्जुन पवार, भारत खाटपे, नारायणराव सणस विद्यालयचे अशोक कापरे, संस्कृती फाउंडेशनचे शरणू जवळगी, स्नेह वसंत फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत धायरीतील मल्हार गड खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा पहिला टप्पा पार
 धायरीतील मल्हार गड खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण करताना एनपीसी संस्था, संस्कृती फाउंडेशन व सिंहगड ट्रेकर्सचे पदाधिकारी

वृक्षारोपणाच्या पहिल्या टप्प्यात धायरी येथील मल्हार गड खंडोबा मंदिर आणि नारायणराव सणस विद्यालय वृक्षारोपणासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली होती. वृक्षारोपणात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी पुढील टप्प्यात पुणे महानगरालिकेच्या शाळेत वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे सिंहगड ट्रेकर्सचे चंद्रशेखर पोकळे पाटील यांनी सांगितले.


अमित शहा म्हणाले, आपण विविध व्यवसाय करत असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारे निसर्गाला हानी पोहचवत असतो. परंतु ती हानी कमी करून आपण पर्यावरण सुदृढ करण्यावर भर दिला पाहिजे. या उपक्रमासाठी मल्हार गड खंडोबा मंदिर, नारायणराव सणस विद्यालय आणि स्नेह वसंत फाऊंडेशनने विशेष सहकार्य केले. 


जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत धायरीतील मल्हार गड खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण
धायरीतील मल्हार गड खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण करताना एनपीसी संस्था, संस्कृती फाउंडेशन व सिंहगड ट्रेकर्सचे पदाधिकारी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.