सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट कडून मुक्ता बर्वे, अजित वाडीकर आणि सुहास शिरसाट यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट कडून मुक्ता बर्वे, अजित वाडीकर आणि सुहास शिरसाट यांना सूर्यागौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 

पुणे: गेली काही दिवस आपल्याकडे Y 'वाय' या मराठी चित्रपाटाची भलतीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे कथानक अद्याप समोर आले नसले तरी हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे  प्रमुख भूमिकेत आहे. अनेक कलाकार, प्रेक्षक आणि अनेक मान्यवर मंडळी हातामध्ये 'वाय' अक्षर लिहीलेले पोस्टर घेऊन चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून त्याच अनुषंगाने "वाय" चित्रपटाच्या टीमने सूर्यदत्ता कॉलेजच्या बावधन कॅम्पसला भेट दिली. या वेळी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट कडून दिला जाणारा सूर्यागौरव राष्ट्रीय पुरस्कार आणि सूर्यागौरव सन्मान सोहळा या वेळी पार पडला.


सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट कडून भारतीय चित्रपट सृष्टीत दिलेल्या भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार आणि सन्मान दरवर्षी देण्यात येत असतो. वाय या मराठी चित्रपटाच्या प्रोमोशनचे औचित्य साधत मुक्ता बर्वे, अजित वाडीकर आणि सुहास शिरसाट यांना सूर्यागौरव राष्ट्रीय पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष्य संजय चोरडिया व सेक्रेटरी सुष्मा चोरडिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच  संदीप फाटक, रसिका चव्हाण, आणि ओमकर गोवर्धन यांना सूर्यगौरव सन्मान चिन्हाने गौरवण्यात आले.


संजय चोरडिया म्हणाले की भारतीय चित्रपटाचं योगदान खूप मोठ आहे. विशेषतः मराठी चित्रपटांची ओळख ही दर्जेदार कलात्मक निर्मितीसाठी आहे. त्या मागे दिग्दर्शक,  अभिनेते,  अभिनेत्री आणि सहकलाकारांचे  योगदान आहे. या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत या चित्रपाटाच्या यशासाठी शुभेच्छा व्यक्त करत मुक्ता बर्वे, अजित वाडीकर आणि सुहास शिरसाट यांना सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार सन्मान प्रदान करताना सूर्यदत्ताला विशेष आनंद होत आहे. संदीप फाटक, रसिका चव्हाण, आणि ओमकर गोवर्धन यांच्या चित्रपट आणि मराठी सीरिअल मध्ये विशेष कामगिरीची नोंद घेत त्यांनाही सूर्यगौरव सन्मान प्रदान करत आहोत. 


या वेळी बोलताना अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी सूर्यागौरव राष्ट्रीय पुरस्कार आभार मानले तसेच चित्रीकरणाचे काही अनुभव सांगत सर्वांना थेटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले


दरम्यान अभिनेत्री मुक्ता बर्वे, दिग्दर्शक अजित वाडीकर आणि वाय मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणाने संवाद साधला. विद्यार्थयांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरतेही दिली. चित्रपटाच्या टीम कडून काही निवडक विद्यार्थ्यांना वाय चित्रपटाच्या पोस्टरचे टिशर्ट देण्यात आले. मराठीतील आघाडीच्या कलाकारांशी गप्पा मारल्यानंतर विद्यार्थ्यां उत्साह द्विगुणित झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पितालिया यांनी केले. 


या वेळी संस्थेच्या सचिव आणि उपाध्यक्ष - सुष्मा चोरडिया, सहायक उपाध्यक्ष्या - स्नेहल नवलखा, सिद्धांत चोरडिया, सुनील धारिवाल, प्रतीक्षा वाभळे, डॉ सिमी रेठरेकर आणि  स्टाफ उपस्थित होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला २००० विद्यार्थी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.