पुण्यातील बैलगाडा शर्यतीला गालबोट, एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

 

पुण्यातील  बैलगाडा शर्यतीला गालबोट, एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी


पुण्यात वडकी इथं बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यत शौकिनांनी गर्दी केली होती. दरम्यान, एक धक्कादायक दुर्घटना घडली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे तर तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्याजवाळील वडकी येथील बैलगाडा शर्यतीचे आयोजन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले होते. आज सायंकाळी या शर्यतीवेळी चेंगराचेंगरीची घटना घडली. शर्यत शौकिनांना बसण्यासाठी लावण्यात आलेले बेंच कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.