अभिनेत्रीच्या हातावर लागली होणाऱ्या पतीची मेहेंदी... लवकरच अडकणार विवाहबंधनात...

 


मुंबई : 20 सप्टेंबर 2023 : सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. परिणीती चोप्रा लवकरच होणार परिणीती राघव चड्ढा...खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल... 

मुंबईमध्ये एका हॉटेल बाहेर दोघांना स्पॉट करण्यात आल्यानंतर राघव आणि परिणीती एकमेकांना डेट करत असल्याचं रहस्य सर्वांसमोर आलं.  लवकरच दोघे विवाह बंधनात अडकणार असून  दोघांच्या लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे. मेहंदी आणि हळदी समारंभासाठी परिणीती 17 सप्टेंबर रोजी मुंबईहून दिल्लीत दाखल झाली होती. अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे..

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा मेहंदी सोहळा 19 सप्टेंबरला झाल्याचे सांगण्यात येत आहे. राघव चढ्ढा यांच्या घरी हा सोहळा पार पडला. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्न उदयपूर येथील द ओबेरॉय उदयविलास हॉटेलमध्ये होणार आहे. दोघांच्या लग्नासाठी पाहुणे लग्न ठिकाणी पोहोचत आहेत… एववढंच नाही तर, परिणीती आणि राघव यांचं घर देखील नव्या नवरी प्रमाणे सजवण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.