गणेश स्थापनेच्या मुहूर्तावर नवीन संसदेचाही श्रीगणेशा...

 


नवी दिल्ली :   19 सप्टेंबर 2023 : नवीन संसद भवनाचा (New Parliament) आज श्रीगणेशा झाला. मंगळवारी 19 सप्टेंबर 2023 रोजी संसदेचे प्रत्यक्ष कामकाज सुरु झाले. जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात कामकाजाची सुरुवात म्हणजे  युगाची सुरुवात या नव्या संसद भवनातून भारत पाहत आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी नवीन संसद भवनाची कोनशिला ठेवण्यात आली. 64,500 चौरस मीटरवर हे नवीन लोकशाही मंदिर स्थापित करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 1280 सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे भव्य दिव्य संसद भवन पाहिल्यानंतर हे तयार करण्यासाठी किती खर्च झाला असेल याची चर्चा सुरु झाली आहे. या नवीन संसद भावनांची वैशिष्ट्ये जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 

अशी आहे नवीन संसद भवनाची रचना

  • नवीन संसदेला सहा महाप्रवेशद्वार
  • तीन अश्व, गज आणि गरुड असे औपचारिक दरवाजा
  • अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यालये हायटेक आहेत
  • कॅफे, डायनिंग एरिया, समिती बैठकीसाठी विविध खोल्या
  • कॉमन रुम्स, महिलांसाठी लाऊंज आणि VIP लाऊंजची व्यवस्था

नवीन संसद भवनात लोकसभेचे 888 सदस्य तर राज्यसभेचे 300 सदस्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहातील सदस्य एकत्र आले तर 1280 सदस्य एकत्रित बसतील.  महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाचा ठराव झाल्यास त्यासाठी पण हे नवीन संसद तयार असेल. नवीन संसद सदस्यांची बसण्याची व्यवस्था होऊ शकेल अश्या प्रकारे आसन व्यवस्था करण्यात आली आहे. 

नवीन संसद भवन या  971 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम टाटा प्रोजेक्ट्स देण्यात आले होते.  तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत ही नवीन इमारत तयार झाली आहे. ही इमारत चार मजली आहे. इमारत त्रिकोणी आकाराची आहे. जुन्या इमारतीपेक्षा नवीन इमारत जवळपास 17,000 चौरस मीटर आहे. या इमारतीवर भूकंपाचा कुठलाही परिणाम होणार नाही.  सुरुवातीला 971 कोटी रुपयांचा खर्च असणाऱ्या या प्रकल्पासाठी  जानेवारी 2022 रोजी या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये वाढली. स्टील आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर कार्यासाठी मोठा खर्च आला. सेंट्रल पब्लिक वर्क डिपार्टमेंटने 200 कोटी रुपयांचा खर्च वाढला. या नवीन इमारतीसाठी 1200 कोटींचा खर्च आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.