लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित महेश काळे यांची ‘सुर संध्या’ सुरेल मैफिल उत्साहात संप्पन

 

Mahesh-Kale-s-Sur-Sandhya-concert-organised-by-Lahu-Balwadkar-Social-Welfare-ends-with-enthusiasm

पुणे : प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या सुरेल मैफलीची सुश्राव्य पर्वणी सोमवारी सायंकाळी पुणेकरांना ठरली. भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या लहू बालवडकर सोशल वेलफेअरतर्फे दिवाळी विशेष महेश काळे यांचा सुर संध्या कार्यक्रम पार पडला.यावेळी याचि देही याची डोळा अशी अनुभूती घेण्याची संधी रसिकांना मिळाली. या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. अन् त्यानंतर कार्यक्रमाला सुरूवात झाली. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह असंख्य रसिक चाहत्यांनी हजेरी लावली. तर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.


यावेळी पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राज्याचे ओबीसी सरचिटणीस प्रल्हाद सायकर, कोथरुड विधानसभा उत्तर विभाग अध्यक्ष सचिन पाषाणकर, सचिन दळवी, राहूल कोकाटे,उमा गाडगीळ, अस्मिता करंदीकर, कल्याणी टोकेकर,रिना सोमय्या,उत्तम जाधव इत्यादी उपस्थित होते.


यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, लहू बालवडकर हा एका राजकीय पक्षाचा काम करणारा कार्यकर्ता आहे. परंतु केवळ राजकारण, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करीत नाही तर अनेक वर्षांपासून समाजातील सर्व घटकांसाठी काम करतांना लहू बालवडकर पाहत आलो आहे. कोविड सारख्या काळात सुद्धा या सगळ्या बाणेर, बालेवाडी परिसरात लहू बालवडकर यांनी चांगलं काम केलं आहे. त्यावेळी ज्यांना आधाराची गरज होती. त्यावेळी लोकांसमवेत उभ राहणं त्यांना आधार देण्याचं काम त्यांनी केले आहे. केवळ नागरिकांच्या दैनंदिन समस्या, अडचणी नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणीवना निर्माण करणारे अनेक उपक्रम लहू सोशल वेलफेअर संस्था करतांना दिसत आहे. डेंग्यू आजाराची साथ शहरात असतांना रक्ताची कमतरता असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी मागच्या तीन दिवसांपूर्वी या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलं अन् त्यात 1300 रक्त पेशीचं संकलन या सगळ्यांनी मिळून केलं. असं पुणे महापालिकेचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.


सामाजिक आणि राजकीय काम सगळेच करतात परंतु समाजाप्रती असलेली संवेदना दाखवण्याचं काम क्वचित लोकं करतात. त्यामध्ये लहू बालवडकर यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. लहू बालवडकर यांनी चैतन्य स्पर्श या नावाने भारतातल्या बारा शक्तीपीठांच्या पादुकांचा दर्शन सोहळा सलग तीन वर्ष आयोजित करून पंचवीस हजार पेक्षा जास्त नागरिकांना त्या पादुकांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ लहू बालवडकर सोशल वेल्फेअर च्या माध्यमातून दिला. दिवाळी आंनदाची जाऊ म्हणून पंधरा हजार लोकांना अन्नदान करण्याचं काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. अशा सगळ्या संवेदनशील समाजाप्रती प्रतिबद्धता असणारे आमचे लोकप्रतिनिधी याठिकाणी आहेत. याचा आम्हाला खूप अभिमान असल्याचं भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी म्हटले.


‘सुर संध्या’ २०२३ या कार्यक्रमात  यावेळी सामाजिक क्षेत्रात सुधीर जोशी, भुषण चौधरी, राजश्री टिकेकर, क्रिडा क्षेत्रात हेमंत बालवडकर, दिनेश चाकणकर यांना तर गणेश मुरकूटे, अरूण खंडेलवाल, यांना उद्योग क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात संदीप बोरगावकर यांना तर युवा प्रवचनकार रोहित रामदास बालवडकर, सामाजिक क्षेत्रात प्राची सिद्धीकी, सुमन ब्राह्मणकर, योग किर्तनकार श्रीकांत चिटणीस, पत्रकार मोहसीन शेख, आरोग्य क्षेत्रात डॉ. अतुल शिरूडकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


दरम्यान, सुर संध्या या कार्यक्रमात महेश काळे यांनी कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय संगीताने केली. या कार्यक्रमात पुर्वाधार्थ त्यांच्या नावाजलेल्या सुमधुर संगीताने केली तर उत्तरार्ध भागात रसिकांना सुचवलेल्या संगतीने मैफल सजवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.