...अन्यथा ४८ तासांच्या आत आम्ही या पोलिसाचा व्हिडीओ ट्वीट करू, धंकेगरांच्या नव्या ट्वीटमुळे खळबळ

Pune-waters-Pub-Police-Constable-and-Ravindra-Dhangekar


पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलिसांवर अनेक विरोधकांनी रोष व्यक्त केला. हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडून दडपवले गेल्याचा आरोप केला जातोय. पुण्यातील कसबा पेठेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण उचलून धरलंय. आता त्यांनी याप्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. धंगेकरांनी एक्स या समाज माध्यमावर ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. 


यात धंगेकर माहित आहेत की, 

राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार...?

असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.


दिवस १ला - मुंढवा पोलीस स्टेशन

हे पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात.त्यापैकी निलेश पालवे ,काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स ,हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करतात.


सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत.

आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा ४८ तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील.


पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन.


जय हिंद ,जय पुणेकर..!





 

पुण्याचे काँग्रेसचे नेते रविंद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. पुणे पोलिसांकडून पब, हॉटेल्स यांच्याकडून हफ्ते गोळा करण्याचे काम केले जात आहे, असा दावा धंगेकर यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. फोटोतील पोलिसांवर कारवाई करा अन्यथा 48 तासांच्या आत आम्ही या पोलिसाचा व्हिडीओ ट्वीट करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.