पुणे अपघात प्रकरणावर शरद पवार म्हणाले, हा प्रश्न तुम्ही अजित पवारांनाच जाऊन विचारा...

sharad-pawar-talk-on-pune-accident-kalyaninagar-latest-marathi-news


पुण्यामध्ये शनिवारी रात्री आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेचे पुण्यासह संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत आरोपींच्या वकिलांशी आपलेही संबंध असल्याच्या चर्चा आहेत, असे पत्रकारांनी विचारल्यावर पवार जरासे चिडून म्हणाले- "एखाद्या वकिलाला मी भेटलो असेल तर त्याचा संबंध याच्याशी लावता तुम्ही... प्रत्येक गोष्टीवर मीच भाष्य करावे, असे गरजेचे नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडली हे दिसल्यानंतर उगीच याला वेगळे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही".





तसेच पुणे अपघातातील आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार शांत का आहेत? ते काहीच का बोलत नाहीत? असे प्रश्न पत्रकारांनी पवार यांना विचारले. त्यावर ते का बोलत नाहीत, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा, असे म्हणत यावर अधिक बोलणे पवार यांनी टाळले. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.