भोसरी विधानसभेच्या आखाड्यात बैठकांचा जोर वाढला, इच्छूकांनी सुरू केली विधानसभेची तयारी

 

Bhosari Vidhansabha Matdar Sangh

पिंपरी चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर आता सगळी राजकीय समीकरणं बदलून गेले आहेत. त्यामुळेच एका मतदारसंघात तब्बल सहा उमेदवार निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तयारी सुरू करून दिली आहे.


लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुक देखील महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी अटळ आहे. यातच जिथे विद्यमान आमदार आहेत. तेथील त्या जागा त्यांनाच मिळणार असं सुत्र ठरवण्यात आलं आहे. परंतु असं असलं तरी युतीत असलेल्या सर्वच इच्छूक उमेदवारांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मतदारसंघात बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. या बैठकांमध्ये निवडणुकीसंदर्भात रणनिती, नियोजन आणि इत्यादी सुचना पदाधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत.


दरम्यान, भोसरी विधानसभा मतदारसंघात देखील आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधानसभेची तयारी सुरू करून दिली आहे. याठिकाणी भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीवर दावा सांगितला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता विविध उमेदवारांची चाचपणी सुरू करून दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.