पुण्याच्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे ४.३५ मिनिटांनी विसर्जन; भाविकांची मोठी गर्दी

ganesh-visarjan-2024-immersion-of-punes-first-shri-kasba-ganapati-a-large-crowd-of-devotees


पुणे: सर्वांच्या लाडक्या सुखकर्ता, विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी १५ दिवसांपूर्वी संपूर्ण शहरात लगबग सुरू होती. घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या या बाप्पाची आराधना करताना १० दिवस कधी संपले, कळलेच नाही. शहरात साजऱ्या झालेल्या या आनंदोत्सवाची आज, गणेश उत्सवाची सांगता होत आहे. पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन झाले.

पुण्यातील मानाच्या गणपतीचे विसर्जन अतिशय संथ गतीनं सुरु झाली होती. विसर्जन मिरवणूक सुरू झाली त्या मंडईच्या टिळक पुतळ्यापासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या बेलबाग चौकात पाचवा मानाचा गणपती पोहचायला पाच तास लागले. पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीची मिरवणूक बरोबर साडे दहा वाजता सुरु झाली.


कसबा गणपती टिळक चौकात आल्यानंतर गणपती बाप्पा मोरयाचा जोरदार घोष झाला. कसबा गणपती मंडळाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी साडेदहा वाजता चांदीच्या पालखीतून निघाली. बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्ता मार्गे विसर्जन मिरवणूक दुपारी ३.२५ वाजता टिळक चौकात आली. 

पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीचे विर्सजन झाले आहे. पुण्याच्या पतंगा  घाटावर आरती करून कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पहिल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन 4.35  मिनिटांनी झाले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.


गणपती विसर्जन मिरवणूक 10:30 वाजता सुरू झाली

मानाचा पहिला - कसबा गणपती

10:30 - मिरवणुकीची सुरुवात

11:10 - बेलबाग चौकात 

3:35 - अल्का चौक


मानाचा दुसरा - तांबडी   जोगेश्वरी

10:40 - मिरवणुकीला सुरुवात

12:00 -बेलबाग चौक


मानाचा तिसरा - गुरुजी तालीम

11:10 - मिरवणुकीला सुरुवात

1:12 - बेलबाग चौक


मानाचा चौथा - तुळशीबाग

11:50 - मिरवणुकीला सुरुवात

2:20 - बेलबाग चौक


मानाचा पाचवा - केसरीवाडा

12:25 - मिरवणुकीला सुरुवात

3:23 - बेलबाग चौक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.