"श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या नियमित स्मरणामुळे दृष्टग्रह,रोगपिडा,शत्रु आदि सांसारिक दुःखपिडा दुर होतात व मनुष्य प्राणीमात्रामधे सुख समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे, याच अनुषंगाने जैन धर्मियांमध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या श्री. उवसग्गहरं स्तोत्राच्या सामुहिक पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन तर्फे केले जाते. सध्या अशा उपक्रमांची गरज आहे ज्याच्यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते. यावर्षी स्तोत्र पठणाचे नववे वर्ष असून प्रथम कार्यक्रम २०१७ मध्ये दानशूर आदरणीय श्री. रसिकलालजी धारीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संत व साध्वी म. सा. यांच्या सानिध्यात संपन्न झाला होता.
याही वर्षी ,आर.एम.धारीवाल फाउंडेशन च्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन व उपाध्यक्षा शोभा रसिकलाल धारीवाल यांच्याद्वारे दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी सायंकाळी ४ वाजता आचार्य पद्मश्री चंदनाजी म. सा., पू .श्री मुकेश मुनिश्री म. सा. आणि पू .श्री जयप्रभा विजयजी गुरुदेव म. सा. , पू .श्री आगमचंद्रजी स्वामी म. सा. यांच्या उपस्थितीत "उवसग्गहरं स्तोत्र" ‘सामूहिक पठणाचे आयोजन श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक भवन यश लॉन्स , बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
हा कार्यक्रम वेळेवर ठीक ४ वाजता सुरु होईल. दिलेल्या नियोजित वेळेत लहान -थोर , जैन - अजैन या सर्वांनी सहपरिवार या महामंगलकारी स्तोत्रात सहभागी होऊन लाभ घ्यावा. सहभागी होणाऱ्या पुरुषांनी शुभ्र तर महिलांनी केशरी अथवा पिवळे वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे तसेच कार्यक्रमानंतर लगेच चौविहारची (जेवण) सुद्धा व्यवस्था करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनच्या शोभा रसिकलालजी धारिवाल यांनी दिली आहे.