वृक्षतोड थांबवा, वृक्षपुनर्रोपण वाढवा – शोभाताईंचे काळाला साद घालणारे आवाहन”

If-we-want-to-save-the-earth-saving-the-environment-is-the-need-of-the-hour-Shobhatai-R-Dhariwal

पुणे: जैन धर्मामध्ये संस्कार आणि मूल्य यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहे, धर्मात अनेक मंत्र सांगितलेली आहे त्यापैकी उवसग्गहरं मंत्र संकटावर मात करणारा असून याच मंत्राने श्रीमान रसिकशेठ धारीवाल साहेब रुग्णालयात व्हेंटिलेटर असतांना वैद्यकीय सेवेसोबतच  रोजच्या जापणे सकारात्मक ऊर्जा तयार होऊन प्राण वाचू शकले अशी माझी धारणा आहे ,म्ह्णूनच मी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा दरवर्षी सामूहिक स्तोत्र पठण जाप आयोजीत करते जेणेकरून समाजामध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल आणि अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे ही सामाजिक गरज आहे, यात फक्त जैन समाज सामील होत नसून अजैन समाजही मोठ्या प्रमाणात स्तोत्र पठणाचा लाभ घेतो, यावर्षीचे आयोजनाचे हे नववे वर्ष आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात  स्वतःहून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्वांचे स्वागत करते असे प्रतिपादन शोभाताई आर  धारिवाल यांनी वावेळी व्यक्त केले, आर एम  डी फाऊंडेशन द्वारा आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात भारत भर कार्य केले जाते ,गरजू व हुशार विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे उच्चशिक्षणासाठी मदत केली जाते, अत्यवस्थ  शाकाहारी रुगांना  आर्थिक मदत केली जाते, आज बांधकाम किंवा रस्ते विस्तारण्यासाठी मोठ्या मोठ्या झाडांना तोडल्या  जाते, वृक्षतोडीवर वृक्षारोपण हा पर्याय नसून वृक्षपुनर्रोपण हा जास्त प्रभावी उपाय आहे अशा वेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांच्या द्वारे ५० ते १०० वर्ष्यांची मोठी वृक्ष वाचविण्याची मोठी मोहीम हाती घेतलेली असून आतापर्यंत २१०० पेक्षा जास्त वृक्षांना वाचविण्यात यश आले आहे, पृथ्वीला वाचविण्यासाठी पर्यावरण वाचविणे गरजेचे आहे आवाहनही यावेळी शोभाताई यांनी उपस्थितांना केले. त्याच वेळी त्यांनी यावर्षी डीजे मुक्त दहीहंडी उत्सव साजरा करणारे बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांची स्तुतीही केली आणि एकप्रकारे पृथ्वीला आणि पर्यावरणाला वाचविण्याची धुराच जान्हवी धारिवाल बालन आणि पुनीत बालन यांनी खांद्यावर घेतली आहे यासाठी त्यांनी दोघांचेही अभिनंदन केले.



याही वर्षी दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी सायंकाळी 4 वाजता पद्मश्री  आचार्य चंदनाजी, पू .श्री  मुकेश मुनिजी, पू . श्री जयप्रभ विजयजी, पू .श्री आगमचंद्रजी स्वामी यांच्या उपस्थितीत " उवसग्गहरं स्तोत्र ‘सामूहिक जपाचे आयोजन श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेले होते.


लहानवयातच जान्हवी यांनी बिहारमधील विरायतन संस्थेच्या कार्यात खूप मोठं सहकार्य केले आहे आज विरायतन संस्थेच्या द्वारे सुरु असलेली रुग्णसेवा,शिक्षण कार्य यामध्येही त्यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे मी त्यांना खूप आशीर्वाद देते असे मत आचार्य पद्मश्री चंदनाजी यांनी व्यक्त केले. पू . श्री जयप्रभ विजयजी यांनी उवसग्गहरं स्तोत्र चे महत्व श्रावकांना समजावून सांगितले, तर पू .श्री आगमचंद्रजी स्वामी यांनी अशा प्रकारचे उपक्रम स्तुत्य असून त्याचा लाभ सर्वांना व्हावा, पू .श्री मुकेश मुनिजी यांनी अशा प्रकारचे सामूहिक स्तोत्र जपाचे लोकांसाठी लाभदायक आहेत असे असे आशीर्वाद दिले.


या कार्यक्रमासाठी पुनीत बालन, पोपटशेठ ओसवाल, श्री वालचंदजी संचेती ,श्री विजयकांतजी कोठारी, अचल जैन, विविध जैन संस्थांचे पदाधिकारी, नामवंत उद्योजक, तसेच  शोभाताई आर धारीवाल वसतिगृह एफसी रोड, शोभाबेन आर धारिवाल छात्रालय डेक्कन व शोभाताई आर धारीवाल वसतिगृह चिंचवड येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी, विविध गणेश मंडळे, आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे भाविक तसेच जैन- अजैन बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते. स्तोत्र पठणानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.