मानाजीनगर परिसरातील महावितरणच्या डीपी व ओव्हरहेड केबल्स भूमिगत करण्याची महापालिकेची तयारी

Municipal-Corporation-prepares-to-underground-Mahavitaran-s-DP-and-overhead-cables-in-Manajinagar-area

पुणे: सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मानाजीनगर परिसरातील आदित्य संस्कृती, गंधर्व चौक, ग्रीनसाईड कॉलनी, श्री कंट्रोल चौक, पारी टॉवर या भागात प्रस्तावित असलेल्या महावितरणच्या रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या डी.पी. रस्ते आणि ओव्हरहेड केबल्स संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण दूर करून लवकरच या रस्त्यांचे भूमापन सुरू करण्यात येणार आहे.


सदर प्रस्तावासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहरातील सरचिटणीस भूपेंद्र मोरे यांनी संपर्क कार्यालयामार्फत महानगरपालिकेकडे निवेदन सादर केले होते. त्यानंतर संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाहीचा प्रारंभ केला असून, प्रशासनाने भूमापनास मंजुरी दिली आहे.


महापालिकेच्या पत्रानुसार, मानाजीनगर आदित्य संस्कृती, गंधर्व चौक, ग्रीनलाईट कौंटी, श्री कंट्रोल चौक, पारी टोवर या ठिकाणी संयुक्त पाहणी करून रस्त्यात अडथळा ठरणारे ओव्हर हेड केबल भूमिगत करणे व डी.पी स्ट्रक्चर स्थलांतरित करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


भूपेंद्र मोरे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

या संपूर्ण उपक्रमात भूपेंद्र मोरे यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. त्यांनी वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधून परिसरातील रस्त्यांची गरज, अडथळे, नागरिकांच्या समस्या आणि शहर विकासाच्या दृष्टीने याचे महत्त्व पटवून दिले. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाची  सुरुवात होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.