"शंकर महादेवनचा स्वर, गणेशभक्तांचा गजर – 'बाप्पा मोरया' ठरतोय उत्सवाचा नवा सूर!"

The-song-Bappa-Morya-is-produced-by-Amol-Ghodke-and-Srinivas-Kulkarni-and-sung-by-Shankar-Mahadevan

पुणे: पद्मश्री डॉ. शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड झालेलं "बाप्पा मोरया" हे गाणं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार तसेच युवा उद्योजक श्री. पुनीतदादा बालन यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आलं.


या गाण्याची निर्मिती अमोल घोडके आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केली असून, हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक भक्तिपूर्ण सांस्कृतिक भेट ठरेल.


या गाण्याच्या माध्यमातून हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची परंपरा जपणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पांचा जयघोष करण्यात आला आहे. पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक संगीताचा संगम साधणाऱ्या या गीतात गणेशोत्सवाचे वैभव प्रभावीपणे उभं राहिलं आहे.


"बाप्पा मोरया" या गाण्याला शंकर महादेवन यांचा सुमधुर स्वर लाभला असून, गीताचे बोल आणि संगीत शैलेश चंद्र लोखंडे यांनी लिहिले आणि संगीतबद्ध केले आहेत. संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले असून, रिदम नागेश भोसेकर आणि नितीन शिंदे यांनी केले आहे. गाण्याला भक्तिरसात रंगवण्यासाठी अभिषेक शिंदे, रविराज काळे, समिहान सहस्त्रबुद्धे आणि मनोहर नारवडे यांनी कोरस गायनातून योगदान दिले असून या गीताचे मिक्सिंग अजिंक्य ढापरे यांनी केले आहे.


गाण्याच्या प्रकाशनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि श्री पुनीतदादा बालन यांनी "बाप्पा मोरया" या गीताला शुभेच्छा दिल्या.


या गणपतीच्या विशेष गाण्याला रसिक प्रेक्षकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. Cineshine Media Entertainment या युट्युब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून, अल्पावधीतच लाखो लोकांनी हे गाणं ऐकून भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. शंकर महादेवन यांच्या सुमधुर स्वरांनी सजलेलं आणि पारंपरिकतेला आधुनिक संगीताची जोड देणारं "बाप्पा मोरया" हे गीत गणेशभक्तांच्या हृदयात घर करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.