राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे

राज्यात तीन पक्षांचं सरकार, कोण निर्णय घेतंय हे त्यांचं त्यांनाच कळेना- रावसाहेब दानवे
राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. कोण निर्णय घेतंय, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही, असं टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकासआघाडीला लगावला आहे. ते अहमदनगर येथे आयोजित भाजप कारखानदारांच्या बैठकीसाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. कोण निर्णय घेतंय, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतः निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील केलं जात नाही असं म्हटलं. याचाच अर्थ राज्य सरकारमध्ये समन्वय नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेवरही भाष्य केलं. या विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा न घेता त्यांना श्रेणी दिल्यास या विद्यार्थ्यांना कोविड विद्यार्थी असा शिक्का बसेल, असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.