यापुढे कायमच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे- नगरसेवक प्रसन्नदादा जगताप

यापुढे कायमच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे- नगरसेवक प्रसन्नदादा जगताप
सिंहगड रोड - अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांच्याकडून सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आपल्या सिंहगड रोड परिसरातील आनंदनगर,सनसिटी रोड परिसर, विठ्ठलवाडी परिसर, आपटे कॉलनी परिसर,हिंगणे गाव, अरविंद सोसायटी अशा विविध परिसरातील नागरिकांना गेले तीन चार दिवसांपासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथिक औषधाच्या गोळ्यांच्या किटचे तसेच मल्टिपर्पज इन्फेक्शन हॅण्ड फ्री टूलचे वाटप करण्यात आले.यावेळी याचे  फायदे पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त करून प्रसन्नदादांचे व मित्र परिवाराचे आभार मानले.

यापुढे कायमच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच हात वारंवार साबणाने अथवा सॅनिटायझरने स्वच्छ करण्याची देखील आवश्यकता आहे. त्यासाठी आत्ताच्या तिसर्या टप्यात आपल्या सिंहगड रोड परिसरातील गर्दीच्या जागा,मोठमोठ्या सोसायट्या, दुकाने, हॉस्पिटल, शाळांमध्ये, मोठमोठ्या शॉपच्या दारामध्ये प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने अनेक सॅनिटायझर मशीन फिटींग सह बसवण्यात आले आहेत. तसेच अनेक नागरिकांच्या घराजवळ हे सॅनिटायझर मशीन बसवण्यात आले आहेत. काही नागरिकांनी आमच्याकडून नेऊन स्वत:च्या घराजवळ फिट करुन घेतले आहेत. हे सॅनिटायझर मशीन पायाच्या खटक्याच्या  माध्यमातून हात स्वच्छ करण्यासाठी वापरता येत असल्याने हाताचा स्पर्श करण्याची गरज पडत नाही आणि त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. नगरसेवक प्रसन्नदादा जगताप

यावेळी किशोर कुलकर्णी, अनंत शहाकर, सुरेश देशमुख,सोमशेखर कमतगी,रवि चौधरी, अनिल तोडकर, ओंकार तोडकर,प्रशांत तोलगेकर, गणेश चौधरी,लखन कराड, गणेश सावंत आदी प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या सहाय्याने साधारणतः साडे तीन हजार गोळ्यांच्या किटचे तसेच तीन हजार हॅण्ड फ्री टूलचे आतापर्यंत वाटप करण्यात आले असून अजून पुढे दोन ते तीन दिवस हे वाटप सुरू राहिल.

अश्या प्रकारे अॅड प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने नागरिकांची काळजी व त्यांना कोरोना महामारीच्या या कठीण काळात धीर देण्यात येत आहे.तसेच जितकी जास्त मदत करता येईल तितकी मदत सुरू आहे. यातूनही जर हे किट कुणाला मिळाले नसेल माझ्याशी संपर्क साधावा असे
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.