![]() |
शंभुरत्न ब्रिगेडच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी घेतलेला सहभाग. |
सिंहगड टाईम्स - सध्या करोनाच्या साथीमुळे राज्यात बाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेनदिवस वाढ होत असल्याने रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शंभुरत्न ब्रिगेडच्या वतीने आंबेगाव बु. मध्ये आज भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
मोठ्या संख्येने दात्यांनी रक्तदान करून शिबीरास चांगला प्रतिसाद दिला. परिसरातील युवकांनी शंभुरत्न बिग्रेडचे अध्यक्ष प्रमोद घुले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. यावेळी रक्त संकलनासाठी आधार ब्लड बॅकेचा वैद्यकीय कर्मचारी वर्ग हजर होता. शिबीराची वेळ सकाळी अकरा ते संध्या. पाच होती. दुपारी तीन वाजेपर्यत १५० रक्तदात्यांनी रक्तदान झाल्याची माहिती देऊन करोना उद्रेकाच्या पाश्वभूमीवर आजारी रूग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये या हेतूने आपण शिबीराचे आयोजन केले असल्याचे शंभुरत्न ब्रिगेडचे अध्यक्ष प्रमोद घुले यांनी सांगितले. सध्या लाॅकडाऊनच्या काळात नागरीकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शंभुरत्न ब्रिगेडने नेहमी विविध समाजपयोगी उपक्रम राबवून परिसरातील सामाजिक कार्यात महत्वाचे योगदान दिले आहे.
शिबीराचे उद्घाटन हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी संदीप दळवी, अमित फाले, कालीदास वासवंड, किशोर मोंगल, संदिप रेणूसे, मयुर बेलदरे, अभिजित वासवंड, मयुर कोंढरे, अनिकेत फाले, ओमकार चव्हाण,किरण धुमाळ,उपेंद्र चव्हाण,प्रतिक चांदेकर, ह्रषिकेश घार्गे, संदिप नलावडे, अभिजित बेलदरे, अभिजीत लोंढे आदि मान्यवरांसह स्थानिक नागरीक उपस्थित होते.