महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार आज पुणे मनपातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नगरसेवकांची बैठक शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार सुनील टिंगरे आणि विरोधी पक्षनेत्या सौ.दीपालीताई धुमाळ यांच्या उपस्थितीमध्ये मनपातील विरोधी पक्षनेता कार्यालयात पार पडली.या बाबाग माहिती देताना आमदार चेतन तुपे यांनी सांगितले कि या बैठकीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव व पुणे शहरातील सद्यस्थिती या विषयावर चर्चा करण्यात आली.
या वेळी पुणे शहराच्या कानाकोपऱ्यात मदत पोहोचली की नाही याचा आढावा घेण्यात आला. पुणे शहरातील 323 रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे असे सांगताना आमदार चेतन तुपे यांनी पुढे सांगितले कि पावसाळ्याची करायची कामे जसे नालेसफाई, गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे नाल्याच्या पडलेल्या भिंतींची दुरुस्ती या विषयावरती चर्चा झाली. कोरोना प्रादुर्भावामुळे विकासकामे थांबलेली आहेत ती लवकरात लवकर मार्गी लागावीत अशीही मागणी नगरसेवकांनी याबैठकीत केली असल्याचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.