धायरी येथे राष्ट्रवादी काँगेस पक्ष्याच्या वर्धापन दिनानिमित्त १० जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

Rashtrwadi Blood Donation धायरी येथे राष्ट्रवादी काँगेस पक्ष्याच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
धायरी : सध्या करोना विषाणूच्या प्रदुभवामुळे अनेक गोष्टींवर जसा परिणाम झाला आहे तसाच रक्तदानावरही खूपच परिणाम झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी डॉक्टर सेल आणि आचार्य आनंद ऋषी ब्लड बँक यांच्या संयुक विद्यमाने ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धापनदिनाचे औचित्य साधून धायरी येथील ब्रम्हगिरी आर्किड, लोकमान्य बँकेसमोर गारमाळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

कोरूना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन असल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री मंत्र्यांनी वेळोवेळी आवाहन केले आहे त्याच पार्श्वभूमीवर धायरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदानाने कोरोना होत नाही पण रुग्णाचे प्राण वाचण्यास निश्चितच मदत होऊ शकते.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला  राष्ट्रवादी काँगेस पक्षा मार्फत मास्क, सॅनिटाईझर, ब्लडग्रुप कार्ड आणि सर्टिफिकेट दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी येवून रक्तदान करून आपण एक सामाजिक जबाबदारी पार पाडावी.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.