Depression is an awful reality
आज जी बातमी बघितली! खर म्हणजे बघितल्या वर तर धक्काच बसला, मनात विचार आला असे कसे होऊ शकते पाहिलं तर विश्वास बसत नव्हता म्हणून ३-४ न्यूज चॅनेल्स बदलून बघितले म खरे वाटले. पण बघून व एकूण खूप वाईट वाटले म्हणजे असे कसे होऊ शकते ना जो माणूस यशाच्या शिखरावर होता. पुढे पूर्ण आयुष्य होते अजून खुप काही करण्या सारखे बाकी होते. आता बघितले तर तसे फक्त सुरुवात झाली होती. अजून तर पूर्ण पिक्चर बाकी होता पण पिक्चर पूर्ण होण्याआधी च संपला म्हणजे संपवला मी बोलतोय त्या व्यक्ती विषय ज्याची फिल्म इंडस्ट्रीज मधली सुरवात च एखाद्या मूवी च्या हिरो प्रमाणे झाली, खूपच कमी वेळेत त्याने या फिल्म इंडस्ट्रीज मध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती, मी त्या सुशांतसिंग राजपूत विषयी व त्याच्या सारख्या व आपल्या सारख्या अनेक यंग पीढी विषयी बोलत आहे.तसे बगायला गेले तर काय कमी होते सुशांत कडे पैसा होता यश होते, नाव होते, इज्जत होते म्हणजे सर्व काही होतं पण तरी त्याला आत्महत्या करावी लागली का तर नेराश्य, एकूण थोडं विचित्र वाटतं याला कसले नेराश्य असेल बरं पण आयुष्य हे असे आहे ना तुम्ही कधीच प्रेदिक्ट नाही करू शकत कधी काय होईल ते. आणि त्याच्या बाबतीत पण तेच झाले. आणि विचार करा मागच्या वर्षी त्याचाच एक मुव्ही आला होता छिचोरे ज्या मध्ये हाच आपल्या ला सांगतो की आत्महत्या हे काही ऑपशन नाही आहे तुमचे नेराश्य व तुमचं अपयश लपवण्याचे. तर तुम्ही स्वतः वर विश्वास ठेवा आणि त्यातून बाहेर निघा आणि आज त्याला स्वतःलाच आत्महत्या करावी लागली म्हणजे खूप वाईट वास्तव आहे.
बरे या गोष्टी फक्त सुशांत बरोबरच झाली आहे असे नाही आजची जी आपली पीढि आहे तिला डिप्रेशन सहन होत नाही व ते त्यातून बाहेर निघत नाहीत व हे असे पाऊल उचलतात. कारण आपल्या पीढी मध्ये पेशन्स लेव्हल खूप कमी आहे व ट्रेस सहन होत नाही. म्हणून मला काय वाटते ना माणसानं आपल्या गोष्टी ज्या आहेत ज्या मुले आपल्या ला त्रास होतो त्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. म ते तुम्ही कोना बरोबर पण करा ज्यांच्या बरोबर बोल्याने तुम्हाला मन मोकळे झाल्या सारखे वाटते त्यांच्या बरोबर करा पण करा. तुमच्या इमोशन ला वाट मोकळी करा गोष्टी शेअर करा जेणे करून तुमचं मन हलकं होईल व हे असले विचार मनात येनार नाही. काय आहे ना आपण जेवढया गोष्टी मनात साठवून ठेऊन त्याचा आज ना उद्या कधी तरी असा विस्फोट होण्या पेक्षा गोष्टी शेअर केलेल्या कधी पण चांगल्या.
दुसरी गोष्ट आपल्या आजूबाजूला असे भरपूर आपले मित्र आपले नातेवाईक म्हणजे ज्यांना आपण ओळखतो असे भरपूर लोक आपल्या ला भेटतील. जे या डिप्रेशन मधून जात असतात तेव्हा आपण त्यानं साथ देण्याऐवजी त्यांना एकट सोडतो व विचार करतो की समोरच्या व्यक्तीला एकांताची गरज आहे. पण काय माहित त्याला आपली तेव्हाच जास्त गरज असेल. म्हणून आपल्या जवळच्या ना कॉल व मेसेज करून त्यांची विचारपूस करत जा त्यांना पॉझिटिविटी देत जा काय सांगता येते . जर ती समोरची व्यक्ती असा काही विचार करत असेल आणि तेव्हाच आपला कॉल त्याला गेला व आपल्याशी बोलून जर तो मोकळा झाला तर कदाचित त्याचा विचार बदलू शकतो व अशाप्रकारे आपण आपल्याच जवळच्या माणसाचा जीव वाचवू शकतो.
कसे आहे ना देवाने आपल्याला आयुष्य दिले आहे आणि ते जगायचे कसे ते आपण ठरवायचे आहे. कोणाशी भांडण करुन कोणावर राग ठेवून काय मिळणार आहे. इथे प्रत्येकाला कधी न कधी जायचेच आहे तर आहे ते आयुष्य चांगल्या प्रकारे जगलो पाहिजे. कोणाशी राग- रुसवे धरून काय भेटणार आहे. जर हे आयुष्यच नाही राहिले तर कोना वर रागावणार आणि कोणावर रुसणार, नाही का? प्रत्येकाणे हा विचार केला ना की आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती म ते आपले घरातले असुद्या, मित्र असुद्या, नातेवाईक असुद्या प्रत्येकाला आपण आपल्या परीने जसे होईल तसे जगण्याचा सकारात्मक मार्ग देत गेलो ना तर कदाचित हे आत्महत्या चे प्रमाण कमी होऊ शकते.
म्हणून सांगतो आजच्या या बातमी ने आपल्याला खूप मोठा धडा ढिला आहे की नुसते पैसा, यश ,फेम असून उपयोग नाही तर आपल्या जवळ आपली बोलणारी माणसे पण पाहिजे. ज्यांच्याजवळ आपण आपलं मन मोकळे करू शकू व हे असले विचार आपल्या मनात येण्यापासून थांबवू शकू.
छोटेसे आयुष्य आहे जे आपल्याला भेटले आहे हसत हसत जगा प्रॉब्लेम, अपयश सर्वाना येते पण त्यातून बाहेर कसे निगता येईल ना ते आपल्याला ला जमले पाहिजे हे महत्त्वाचे आहे.
खुश रहा।।आनंदी राहा।। आणि आनंद वाटत रहा।।

