कोरोना प्रादुर्भावामुळे देशाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमुळे भारताला नवीन संधी मिळण्यासोबत एक नवी ताकदही मिळेल, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या.
भाजपच्या दुसऱ्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने व्हर्च्युअल जनसंवाद रॅलींचे देशभर आयोजन केले आहे. आज या रॅलीत स्मृती इराणी यांनी दिल्लीतील भाजप कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मोदी पहिल्यांदा 2014 मध्ये पंतप्रधान बनले आणि त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा त्यांना जनादेश मिळाला. मोदी सरकारच्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण झाले आहे. ही सहा वर्षे भारताच्या प्रगतीची ठरली आहेत. देशात 60 वर्षांपासून असलेले अनेक प्रश्न मोदींनी सोडविले आहेत.
कोरोना संकटाच्या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रेशन उपलब्ध करुन दिले आहे. याचबरोबर गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडरही देण्यात आले.देशाला आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प मोदींनी केला आहे. हा संकल्प पूर्ण होणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटात 11 कोटींहून अधिक जणांना जेवण दिले आहेत. याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे सहकारी आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करते, असे इराणी म्हणाल्या. Smurti Irani