राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सातववाडी येथे डॉक्टर आपल्या दारी

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सातववाडी येथे डॉक्टर आपल्या दारी
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस, डॉक्टर सेल, पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने  व मा. महापौर नगरसेविका वैशाली सुनिल बनकर तसेच डॉ.शंतनु जगदाळे यांच्या वतीने सिद्धी विनायक काँलनी सातववाडी या ठिकाणी शिबीराचे नियोजन करण्यात आले होते.

सताववाडी परिसरात कोरोना पेशंट सापडल्यामुळे नागरिकामधे भितीचे वातावरण होते. या शिबिराच्या माध्यमातून त्यांना दिलासा मिळाला. या शिबीरात डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी सहभाग घेतला. 450लोकांची आरोग्य तपासणी करून घेतली तसेच त्याना मोफत औषधं वाटप करण्यात आले

डॉ.शंतनु जगदाळे व डॉ.निरंजन रेवडकर यांच्या वतीने Arsenicum-Album-30C या होमियोपँथी मेडिसिन चे वाटप करण्यात आले. मा. नगरसेवक सुनिल बनकर,रामदास वाघ, आदी मध्ये सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.