धायरी येथे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांना आंबे वाटप

धायरी येथे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांना  आंबे वाटप
धायरी दि. १३ युवासेना प्रमुख व महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खडकवासला आणि संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज पहाटे वृत्तपत्र विक्रेते बांधवांना पर्यावरण पूरक पिशव्यांमधून आंब्यांचे वाटप करण्यात आले.

शिवसेना विभाग प्रमुख निलेश गिरमे यांच्या नेतृत्वाखाली राम तोरकडी, संजय गायकवाड, समीर बदडे, , विजय कणसे, मनोज चव्हाण, लोकेश राठोड यांनी आयोजलेल्या या कार्यक्रमास वृत्तपञ विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, विभागीय प्रमुख अनंता केंडे व श्री पवार यांची उपस्थिती लाभली. १७० विक्रेते बांधवाना लाभ मिळालेल्या या कार्यक्रमाची सांगता मा. आदित्य ठाकरे यांना दीर्घायुष्य चिंतून शुभेच्छा देऊन करण्यात आली.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.