"या" दोन डॉक्टरांच्या उपक्रमांचे होतेय सर्वत्र कौतुक

तब्बल अडीच हजार कुटुंबांना "आर्सेनिक अल्बम 30" गोळ्यांचे मोफत वाटप

तब्बल अडीच हजार कुटुंबांना "आर्सेनिक अल्बम 30" गोळ्यांचे मोफत वाटप


(प्रतिनिधी)
सिंहगड टाईम्स: कोव्हिडं 19 विषाणूचा प्रसार वाढत चालली असताना, शासकीय यंत्रणा तोकडी पडू लागल्याचे चित्र राज्यात आहेत, अशातच 3000 कुटुंबाना म्हणजे 15 हजार लोकांना "आर्सेनिक अल्बम 30" या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप हडपसर विधानसभा मतदारसंघात करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित या उपक्रमात होमिओपँथिक तज्ञ डॉ.निरंजन रेवडकर व डॉ.शंतनु जगदाळे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यांच्या या सोशल उपक्रमाचे हडपसर मध्ये कौतुक होत आहे.

केंद्रीय आयुष मंत्रालयाने "आर्सेनिक 30 अल्बम" या होमिओपॅथी गोळ्या खाण्यास सुचविले आहे, या गोळ्यामुळेशरीरात प्रतिजैविके तयार होवून रोग प्रतिकारशक्ती वाढते,  त्यामुळे तीन दिवस रोज चार गोळ्या आनोशापोटी खाल्ल्यास याचा असर होतो. या गोळ्यांमुळे  कोरोना विषाणू प्रसार रोखण्यास मदत होईल. डॉ.शंतनु जगदाळे अध्यक्ष - हडपसर मेडिकल असोसिएशन

राज्यात कोव्हिडं 19 या विषाणूने कहर केला आहे, पुणे जिल्ह्यात व शहरात या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे, वाढते रुग्ण व वैदकीय सुविधा पाहता शासनाने आता कमी लक्षणे असलेल्या कोरोना ग्रस्तांना घरीच उपचार करण्याचे ठरविले आहे.
तब्बल अडीच हजार कुटुंबांना "आर्सेनिक अल्बम 30" गोळ्यांचे मोफत वाटप

कोव्हिडं 19 विषाणू प्रसार होऊ नये व प्रतिकार शक्ती वाढावी या हेतूने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे व हडपसर चे आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली होमिओपँथिक तज्ञ डॉ.निरंजन रेवडकर, डॉ.शंतनु जगदाळे यांनी हडपसर मध्ये "आर्सेनिक 30  अल्बम " या होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप सुरू केले आहे.

आजवर अडीच हजार कुटूंबाना म्हणजे 10 हजार लोकांना या गोळ्यांचे वाटप केले असून कोव्हिडं 19 विषाणू बाबत जनजागृती देखील केली आहे. या उपक्रमात माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक सुनील बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसर उपाध्यक्षा सविता मोरे, हडपसर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, कामगार नेते सुनील नलावडे, राजेंद्र कोंडे ,मनिषा वाघमारे,प्रा.विदया होडे,बाळासाहेब भिसे यांचे मोलाचे सहकार्य झाले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. अभिनंदन सर ,अध्यक्ष आणि सहकारी म्हणून सर्व HMA सभासदांना अभिमान आहे !
    आपल्या भावी सामाजिक कार्यासाठी मनापासून शुभेच्छा !👍

    उत्तर द्याहटवा