खामगाव मावळ येथील पुलाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना
विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स- आज रोजी दि.१५ आमदार भीमराव तापकीर यांनी सिंहगड भागात रखडलेल्या कामाची पाहणी केली. खामगाव मावळ ता.हवेली येथील पुलाचे काम पुर्ण होण्यास विलंब होत असल्याकारणाने पाऊस चालू झाला आणि पाणी आले तर गाव वाड्याचा जाण्या-येण्याचा रस्ता बंद होईल आणि संपर्क तुटेल या अनुषंगाने खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर आणि पदाआधिका-यांनी पुलांची पहाणी करुन संबंधित ठेकेदाराला जलद गतीने काम करा नागरिकांची गैरसोय नको असे सांगितले या वेळी संबंधित ठेकेदाराने काम लवकर करून घेतो असे आश्वासन दिले आहे.
खामगाव पुलांची खानापूर -पाबे रस्त्याची केली पहाणी. पाऊस पडल्या नंतर रास्ता खराब होऊन आजूबाजूच्या वाड्यांचा संपर्क तुटू नये यासाठी पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.
वृक्षारोपणाचा उपक्रम
मौजे घेरा सिंहगड सांबरेवाडी येथे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षरोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. तसेच खानापूर ते मोगरवाडी रस्त्याची पाहणी केलीयावेळी नितीन वाघ, शरद जावळकर, अमित पवार, श्रीकांत जावळकर, रुपेश साळवे, सुशांत खिरीड, बाजीराव पारगे, ग्रामसेवक सुनील खैरनार, दत्ता जाधव, नंदुशेठ जावळकर, ग्रामसेविका वंदना गायकवाड, तानाजी थोपटे ,सतीश नवघणे, विठ्ठल ठाकर, ग्रामसेक नवनाथ झोळ तसेच विविध पक्षाचे व प्रशासनाचे अधिकारी पदाआधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.