वेल्हे तालुक्यातील दोन महिलांना कोरोनाची लागण

Velhe Sinhagad Times
विशाल भालेराव 
पानशेत, दि. ८ वेल्हे  तालुक्यातील निगडे मोसे येथील प्रसूतीसाठी गेलेल्या  गरोदर महिलेला आणि साखर गावातील एका वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वेल्हे तालुक्यात आजअखेर कोरोबाधित रुग्णसंख्या ३३ वर पोचली असून २ जण उपचार घेत आहेत. एकाचा मृत्यू झाला असून ३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

      निगडे मोसे येथील गरोदर महिला ससूनमध्ये प्रसूतीसाठी गेली होती. तिचा स्वॅब घेतला असता कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले असले तरी माता आणि बाळाची प्रकृती स्थिर आहे. तसेच साखर (ता.वेल्हे) येथील एका वयोवृध्द महिलेला दम्याचा त्रास होत होता. संबधित महिला एका खासगी डॉक्टरकडे गेली असता त्यांनी महिलेला भारती हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला.

 उपचारकाळात तिचा स्वॅब घेतला असता तिलाही कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आले आहे. साखर येथील या बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सात जणांना तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असल्याची माहिती वेल्ह्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अंबादास देवकर यांनी सांगितले.

       कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या गावच्या तीन किलोमीटरचा परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला असल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.