80 वर्षांचे शरद पवार पुन्हा 'शेतकऱ्याच्या बांध्यावर, उद्यापासुन कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा..

Sharad Pwar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये आले आहेत. 'निसर्ग' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्या, मंगळवारी शरद पवार हे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.

चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 9 जून रोजी रायगड आणि 10 जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.

मंगळवारी 9 जून रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईतून गाडीने प्रयाण करणार आहेत. सकाळी 11. 30 वाजता माणगाव, 12.30 वाजता म्हसळा, 1 वाजता दिवेआगार, 2 वाजता श्रीवर्धन, 4 वाजता श्रीवर्धन येथे आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्यासमवेत बैठक, सायंकाळी 5 वाजता हरिहरेश्वर आणि नंतर 6 वाजता बागमांडलामार्गे दापोलीकडे रवाना होणार आहेत. दापोली येथे मुक्काम करणार आहेत.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी 10 जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.