पुण्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू, मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच

मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच

पुणे: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी कलम १४४ लागु करण्याचे आदेश दिलेत. वारंवार सूचना देऊनही अनेक पर्यटक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करताना दिसताहेत.  आषाढी एकादशीची सुट्टी आणि रिमझिम पडणारा पाऊस यामुळे अनेक पर्यटक खडकवासला धरणाच्या परिसरात गर्दी करत असल्याचं चित्र आहे.

हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड


मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर प्रथमच खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत दमदार पावसाने हजेरी लावली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चारही धरणांत मिळून पाणीसाठा ११.३ टीएमसी इतका झालाय. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धरणात ९.४३  टीएमसी पाणीसाठा होता.

हे पण वाचा, न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी कलम १४४ लागु करण्याचे आदेश दिलेत. मात्र, तरीही अनेक पर्यटक या आदेशाचे उल्लंघन करत आहेत.

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे


सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई


 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.