अजितदादा अन् फडणवीसांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांची राष्ट्रवादी-भाजपची पोस्टरबाजी, पुण्यात कोण पॉवरफुल्ल?

NCP-BJP poster campaign for Ajit Dada and Fadnavis's birthday, who is powerful in Pune?


पुणे: पुणे आणि होर्डिंग्ज, त्या होर्डिंग्जची चर्चा आणि व्हायरल हे आता नवीन नाही. कारण, बॅनरबाजीवरुन पुणेकर नेहमीच चर्चेत असतात. मग, ते आय लव्ह यूचे बॅनेर असोत किंवा, पावसात भिजणाऱ्या शरद पवारांच्या छायाचित्राचे भिंतीवरील रंगकाम असो, पुण्यातील या बॅनरबाजीची चर्चा होतेच. ​सध्या पुण्यात अशाच एका पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. शहरातल्या सगळ्या प्रमुख चौकांमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे भलेमोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.


हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड


बॅनरबाजी करणे हे आता पुण्यात काही नवीन नाही. या पुर्वीही पुण्यात काही बॅनर लागले आहे आणि त्याची चर्चाही रंगली आहेत. पुण्यात सध्या भाजप-राष्ट्रवादी यांची पोस्टरबाजी पाहायला मिळत आहे. येत्या 22 जुलैला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीने शहरात जोरदार बॅनरबाजी  केली आहे. येत्या सहा महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असल्याने आपला नेता किती पावरफूल आहे हे दाखवण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे.


हे पण वाचा, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलवाडीचे 'विठ्ठल मंदिर' आषाढी एकादशीला बंद


​येत्या २२ जुलैला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आजी अजित पवार यांचा वाढदिवस आहे. मात्र, त्याआधीच राष्ट्रवादी-भाजपत राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली असून, वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर अजित पवारांनी कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावं, पुष्पगुच्छ पाठवू नयेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात. असे आवाहन केले


 दुसरीकडे वाढदिवसानिमित्त कोरोनाचे गांभिर्य लक्षात घेवून “बॅनरबाजी करू नका,” असे आवाहन फडणवीसांनी केले होते. पण ऐकणारे कार्यकतें आणि पदाधिकारी कोण?  राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या वाढदिवसाचे कॅम्पेन केले आहे. त्याची टॅगलाईन आहे ''कारभारी लय भारी'' अशी आहे. तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं होर्डिंग कॅम्पेन केले त्याची टॅगलाईन आहे ''नव्या पुण्याच्या विकासाचे शिल्पकार.


हे पण वाचा, 

महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे चंद्रकांत पाटलांकडे साकडे


सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई


 न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.