अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षा; अर्ज प्रक्रिया १९ जुलैपासून सुरू होणार

CET-exam-for-eleventh-admission-The-application-process-will-start-from-July-19


 मुंबई: मुंबई: अकरावी प्रवेशांसाठी यंदा प्रथमच घेण्यात येणारी सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) २१ ऑगस्टपर्यंत घेणार असल्याचे सूतोवाच राज्य माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. त्याप्रमाणे  सीईटीसाठी अर्ज प्रक्रिया १९ जुलैला सुरू करण्यात येणार असून,, त्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. 



राज्यातील सुमारे १६.५ लाख विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशांचे वेध लागले आहेत. त्याची प्रक्रिया राज्य माध्यमिक मंडळाकडून सुरू करण्यात आली असून, १९ जुलैपासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाइटवरून सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे. याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, वेबसाइटवर सीईटी पोर्टलची लिंक देण्यात येणार आहे.या लिंकवर विद्यार्थ्यांनी बैठकक्रमांक दाखल केल्यानंतर सीईटी द्यायची आहे की नाही, असे दोन पर्याय विचारले जातील. विद्यार्थ्यांनी दोन्हीपैकी एक पर्याय निवडून नोंदणी करायची आहे. सीईटी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पर्याय निवडल्यानंतर त्यांचा परीक्षा अर्ज मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने दाखल होईल. प्रवेश परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने त्याची केंद्रे लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही मंडळाने स्पष्ट केले. सीईटी परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असून, गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्र या चार विषयांमधील एकूण १०० प्रश्न विचारले जाणार आहेत.


हे पण वाचा, न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत


विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा असणार आहे. CET परीक्षा म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. या परीक्षेत मिळवणाऱ्या गुणांवरच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळू शकणार आहे.

हे पण वाचा, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलवाडीचे 'विठ्ठल मंदिर' आषाढी एकादशीला बंद


जे विद्यार्थी CET प्रवेश परीक्षा देणार नाहीत त्यांना परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनंतर अकरावीत प्रवेश मिळणार आहे. त्यांचं मूल्यमापन हे दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचं शुल्क भरलंय त्यांच्याकडून CET साठी शुल्क आकारण्यात येणार नाही.

प्रवेशाचे अधिकृत संकेतस्थळ : https://11thadmission.org.in

सिंहगड टाईम्स Sinhgad Time



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.