विश्रांतवाडी येथे दोनदिवसीय "मान्सून शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन

Green Apple Exhibition

विश्रांतवाडी: पावसाळा सुरू झाला की आपल्याला बर्‍याच गोष्टींची गरज लागते मग आपल्याला आठवते परंपरागत आपण वापरत असलेल्या वस्तु जसे की छत्री रेनकोट इत्यादि.परंतु काळ आता बदलला आहे. पावसाळ्यात दिवसभर खूप पाऊस पडत असतो. त्यामुळे संपूर्ण वातावरण अगदी थंड आणि आल्हादायक असते. आकाशात काळे ढग थैमान घालून असतात आणि ते सतत गर्जत असतात. या दिवसातील पाऊस सर्वानाच हवा हवासा असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने पडणाऱ्या पहिल्या पावसाचा आनंद घेत असतात. यात केवळ बालकेच नव्हे तर अगदी वृध्द देखील आपला आनंद व्यक्त करण्यात कमी पडत नाहीत. अश्याच आल्हाददायक वातावरणाचे औचित्य साधत तसेच विश्रांतवाडी परिसरातील लोकांच्या दैनंदिन गरज लक्षात घेऊन 'मान्सून शॉपिंग फेस्टिवल' चे आयोजन करण्यात आले आहे. 


विजय मंगल प्रतिष्ठानच्या सहयोगाने विश्रांतवाडी "मान्सून शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. हा शॉपिंग फेस्टिव्हल ८ आणि ९ जुलै रोजी   विश्रांतवाडी येथील, तिरुपती गार्डन मंगलकार्यालयात, सर्वांसाठी खुला राहणार आहे. विश्रांतवाडीकरांना मनसोक्त खरेदी करण्याची संधी उपलब्ध होत आहे. सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत हा फेस्टिव्हल सुरू राहील. 


या शॉपिंग फेस्टिवल साठी विजय मंगल प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य मिळाले असून वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिला आणि व्यावसायिकांना एकत्र करत विजय मंगल प्रतिष्ठान हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. तसेच व्यवसायावर असणाऱ्या कुटुंबांना आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचेही काम विजय मंगल प्रतिष्ठान करत आहे. आपल्या स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचा या मागचा हेतू आहे. 

 

या "मान्सून शॉपिंग फेस्टिवल" मध्ये प्रामुख्याने बनारसी साड्या, चंदेरी साड्या, कांजीवरम, पैठणी, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, प्लाझो, फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, खान्देशी केळीचे वेफर्स, शेंगदाणा गुळपट्टी, शोभेच्या वस्तू, सोलापुरी चादर, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, लोणच्यांचे विविध प्रकार, दर्जेदार गावरान आणि घरगूती मसाले, पापड कुर्डाई, शोभेच्या वस्तू, रेडी टू कुक फूड्स, मातीची भांडी, बेडशीट असे स्टॉल असणार आहेत. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात. या मध्ये स्टॉल हवा असल्यास ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा. या माध्यमातून नक्कीच आपल्या व्यवसायाला विश्रांतवासी परिसरातून चालना मिळेल. तसेच या फेस्टिवलच्या माध्यमातून व्यावसायिकांना विश्रंतवाडी परिसरात बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपणही आपला बिझनेस या लोकांपर्यंत या फेस्टिवलच्या माध्यमातून पोहचवू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.