श्रवणबाधित विद्यार्थ्यांसाठी आशेचा नवा किरण! पुण्यात ‘डॉ. सायरस पूनावाला स्कूल’च्या भव्य इमारतीचे लोकार्पण

A-modern-school-for-the-hearing-impaired-was-established-in-Pune-under-the-initiative-of-Dr-Cyrus-Poonawalla


पुणे: (28 जुलै) सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे चेअरमन व सायरस पूनावाला ग्रुपचे प्रमुख, तसेच जगातील सर्वात मोठे लस उत्पादक असलेले डॉ. सायरस एस. पूनावाला यांच्या हस्ते पुण्यातील लुल्ला नगर येथील ‘शताब्दी केंद्र’ येथे भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअरड या शाळेच्या नव्याने बांधलेल्या भव्य इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या शाळेत श्रवणबाधित मुलांसाठी सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. विलो पूनावाला फाउंडेशन (VPF) या संस्थेने शाळेच्या स्थापनेपासून सातत्याने विविध प्रकारचा पाठिंबा दिला असून, शाळेच्या सुविधा, संसाधने व शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यास मदत केली आहे.


या नव्या परिसरात विस्तीर्ण जागेत उभारलेली ही शाळा श्रवणबाधित (कर्णबधिर) मुलांच्या विशेष गरजांचा विचार करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. या विस्तारीकरणातून शाळेची विशेष शिक्षण आणि सुलभ प्रवेश व्यवस्था यांच्यावरील बांधिलकी अधोरेखित होते. भारतीय रेड क्रॉस सोसायटीद्वारे चालवली जाणारी ही शाळा समावेशक आणि अनुकूल शिक्षण वातावरण निर्माण करण्यावर भर देते.


या प्रसंगी डॉ. सायरस एस. पूनावाला म्हणाले, “विशेष गरजांसह असलेल्या मुलांसाठी उत्तम आरोग्यसेवा व आधार उपलब्ध करून देणे हा माझ्या मनाच्या अगदी जवळचा विषय आहे. आज या नव्या शाळेचे उद्घाटन करताना मला खूप समाधान वाटते. संस्थेच्या माध्यमातून आम्ही आमची संसाधने लोकांच्या हितासाठी योग्य दिशेने वापरण्याचा प्रयत्न करतो आणि ही शाळा त्याच दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.”


यावेळी भारतीय रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विक्रम फाटक, उपाध्यक्ष श्री. माब्रीन नानावटी, मानद सचिव प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नेतृत्व पथकातील सदस्य व शाळेचे शिक्षकवर्ग व पालकवर्ग उपस्थित होते.


शाळेविषयी माहिती:

1976 साली स्थापन झालेली डॉ. सायरस पूनावाला स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअरड ही श्रवणबाधित मुलांसाठी कार्यरत असून, त्यांना आत्मनिर्भर करण्याचे व शिक्षणाद्वारे सक्षम करण्याचे कार्य करते. पुण्यातील प्रमुख शाळांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी ही शाळा शिक्षणाबरोबरच थेरपी व वैयक्तिक प्रगतीवर भर देते. विलो पूनावाला फाउंडेशनने आर्थिक व इतर सहाय्य पुरवून या शाळेच्या भौतिक व शैक्षणिक सुविधांमध्ये भर घातली आहे. ही संस्था दानदात्यांच्या सहाय्यावर चालणारी असून पुण्यातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने चांगल्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.