गाव कोणत्या गटात? निवडणूक इच्छुकांची झोप उडाली! पुणे जिल्हा परिषद गट-गण आराखडा जाहीर

Draft-group-group-plan-announced-for-Pune-Zilla-Parishad-and-Panchayat-Samiti-elections


पुणे: पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप रचना जिल्हा प्रशासनाने अखेर जाहीर केली आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यात ७३ जिल्हा परिषद गट आणि १४५ पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले आहेत. या आराखड्यावर २१ जुलै २०२५ पर्यंत हरकती व सूचना सादर करण्यास नागरिकांना संधी देण्यात आली आहे.


जुन्नर, खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यांना सर्वाधिक आठ जिल्हा परिषद सदस्यांची संख्या मिळाली आहे, तर सर्वात कमी म्हणजे दोन सदस्य वेल्हा तालुक्यात असणार आहेत. त्यामुळे ७३ पैकी २४ सदस्य हे केवळ या तीन तालुक्यांमध्ये निवडून येणार आहेत.


गावागावांची मोर्चेबांधणी सुरू

प्रारूप आराखडा जाहीर झाल्याने ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोणते गाव कोणत्या गटात आले, याचा स्पष्ट होऊन इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेषतः हवेली तालुक्यात सात गट कमी झाले असून जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यांत प्रत्येकी एका गटाची भर पडली आहे.


सन २०११ च्या जनगणनेनुसार ही प्रभाग रचना करण्यात आली आहे. सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ७५ होती. मात्र हवेली आणि मुळशी तालुक्यातील काही गावांचा समावेश पुणे महापालिकेत गेल्याने तसेच उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांची नगरपालिका स्थापन झाल्याने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य संख्या कमी झाली आहे.


तालुका निहाय गट आणि गण रचना (लोकसंख्येसह) :

तालुका लोकसंख्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य

जुन्नर ३,७३,९८७ १६

आंबेगाव २,१४,१३३ १०

शिरूर ३,४८,३०३ १४

खेड ३,५१,७६६ १६

मावळ २,४८,२८५ १०

मुळशी १,४९,२३५

हवेली २,६०,८२३ १२

दौंड ३,३१,०४६ १४

पुरंदर १,८९,३२३

राजगड ५४,५१६

भोर १,६७,६६३

बारामती ३,१७,७४९ १२

इंदापूर ३,५७,६६८ १६

एकूण ३३,४८,४९५ ७३ १४६


आराखड्यावर हरकती आणि सूचनांसाठी वेळापत्रक :

२१ जुलै २०२५ पर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार.

२८ जुलैपर्यंत या हरकतींवर सुनावणी घेऊन विभागीय आयुक्तांना अंतिम प्रस्ताव सादर करण्यात येईल.

१८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल.


राजकीय वातावरण तापतंय...

प्रारूप आराखड्यामुळे तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक गावांचे गट व गण बदलल्याने स्थानिक राजकारणाचा समतोल ढासळण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवार, विद्यमान सदस्य, माजी पदाधिकारी या सर्वांनी नव्याने गट गण पाहून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.