पुणे: २ जुलै २०२५ – भारतातील आघाडीच्या टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कंपनी मॅटर ने आज आपल्या क्रांतिकारी इलेक्ट्रिक बाईक ऐरा च्या पुणेतील अधिकृत लॉंचची घोषणा केली. अभियांत्रिकी परंपरा, समृद्ध उत्पादन तंत्र आणि मोटरसायकलप्रेमींच्या जोशात असलेल्या समुदायामुळे, पुणे — भारताची दुचाकी राजधानी — हे मॅटरसाठी या भविष्यकालीन बाईकच्या प्रवासाची योग्य सुरुवात ठरते.
भारताची पहिली गिअर इलेक्ट्रिक मोटरसायकल म्हणून ओळखली जाणारी ऐरा आता पुण्यात उपलब्ध झाली आहे. परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेल्या या शहरासाठी, ही एक प्रेरणादायी आणि प्रतीक्षित भेट ठरली आहे.
ऐरा ची बुकिंग्स आता www.matter.in वर सुरू झाल्या आहेत. पुण्यात, ऐरा 5000+ ही बाईक ₹1,93,826 (एक्स-शोरूम) या प्रारंभिक किमतीत उपलब्ध आहे. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ‘इलेक्ट्रिक फ्युचर’चा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
“पुण्यातील राईडर्स मोबिलिटीचं भविष्य स्वीकारण्यात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे मॅटरसारख्या टेक्नॉलॉजी-ड्रिव्हन ब्रँडसाठी पुणे हे केवळ बाजारपेठ नाही, तर एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आमची हायपरशिफ्ट गिअरबॉक्स प्रणाली, लिक्विड-कूल्ड ड्राइव्हट्रेन आणि रायडर-फर्स्ट टेक प्लॅटफॉर्म हे केवळ वैशिष्ट्ये नाहीत — ती एका नव्या युगाची सुरुवात आहेत. यांच्याद्वारे आम्ही मोटरसायकलिंगचा अनुभव नव्याने परिभाषित करत आहोत.” - अरुण प्रताप सिंग, फाऊंडर आणि ग्रुप चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, मॅटर
लवकरच पुण्यात मॅटरचं ‘एक्सपीरियन्स हब’ देखील सुरू होणार आहे, जिथे राईडर्सना ऐरा ची टेस्ट राइड घेता येईल, उत्पादन तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येईल आणि ब्रँडच्या तंत्रज्ञान व विचारधारेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. हे हब मोटरसायकलप्रेमींसाठी एक प्रेरणादायी आणि सामूहिक जागा ठरेल.
MATTER AERA 5000+ – पॉवर. प्रिसीजन. प्रगती.
AERA 5000+ ही केवळ भारताची पहिली गिअर इलेक्ट्रिक बाईक नाही – तर ती एक संपूर्ण नवीन रायडिंग श्रेणी तयार करते. स्थानिक संशोधन व विकासातून साकारलेली ही बाईक, शक्ती, नियंत्रण आणि कनेक्टेड बुद्धिमत्ता यांचा अद्वितीय संगम सादर करते, जो आजपर्यंतच्या कोणत्याही ईव्हीमध्ये दिसलेला नाही.
मुख्य वैशिष्ट्ये:
● HyperShift ट्रान्समिशन – जगातील पहिली ४-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असलेली इलेक्ट्रिक बाईक, ज्यामध्ये ३ राइड मोड्स व १२ एकूण कॉम्बिनेशन्स
● लिक्विड-कूल्ड पॉवरट्रेन – भारतीय रस्ते व हवामान लक्षात घेऊन डिझाइन केलेली, उत्कृष्ट थर्मल एफिशिएन्सीसह
● स्मार्ट ७" टचस्क्रीन डॅशबोर्ड – नेव्हिगेशन, राइड डेटा, म्युझिक कंट्रोल आणि OTA अपडेट्ससह
● ५kWh हाय-एनर्जी बॅटरी पॅक – IP67 रेटिंगसह, प्रमाणित १७२ किमी (IDC) पर्यंतची रेंज
● त्वरित अॅक्सेलरेशन – ० ते ४० किमी/ता फक्त २.८ सेकंदांत; प्रचंड टॉर्क व जलद प्रतिसाद
● प्रगत सुरक्षा व आराम – ड्युअल डिस्क ब्रेक्ससह ABS, ड्युअल सस्पेन्शन आणि स्मार्ट पार्क असिस्ट
● MATTERVerse अॅप – राइड अॅनालिटिक्स, रिमोट लॉक/अनलॉक, लाईव्ह लोकेशन, जिओ-फेन्सिंग इत्यादी
● स्मार्ट की – कीलेस रायडिंगचा अनुभव
● अत्यल्प ऑपरेटिंग खर्च – केवळ २५ पैसे/किमी; तीन वर्षांत ₹१ लाखांपर्यंतची बचत