तयारीला लागा, राज ठाकरेंची पुणे मनसेला 'राजदूत' आणि 'महाराष्ट्र सैनिक' हटके नवसांजवानी

 


Raj Thackeray In Pune

पुणे: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. 'तयारीला लागा,' असा आदेश देतानाच प्रभागाध्यक्ष पद रद्द करत शाखाध्यक्षांना बळ देण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली. गटाध्यक्षांना 'राजदूत', तर अन्य कार्यकर्त्यांना 'महाराष्ट्र सैनिक' बिल्ला दिला जाणार आहे. पुण्यासाठी अधिक वेळ देण्याची तयारीही राज ठाकरेंनी दर्शवली असून, महिनाअखेरीस ते पुन्हा पुण्यात येणार आहेत.


हे पण वाचा, न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत


मनसेची उद्दिष्टे नागरिकांपर्यंत पोचविण्याच्या सूचना ठाकरे यांनी पदाधिकापदाधिकाऱ्यांना दिल्या. 'तयारीला लागा,' असा आदेश देतानाच प्रभागाध्यक्ष पद रद्द करत शाखाध्यक्षांना बळ देण्याची घोषणाही ठाकरे यांनी केली. ज ठाकरेंनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्र संवाद साधून शहर संघटनावाढीसाठी काय करता येईल, याबाबतची मते जाणून घेतली. उपशहराध्यक्ष, विभागाध्यक्ष, सचिवांचीही बैठक घेऊन त्यांना तयारीला लागण्याची सूचना केली. पुण्यासाठी अधिक वेळ देण्याची तयारीही राज ठाकरेंनी दर्शवली असून, महिनाअखेरीस ते पुन्हा पुण्यात येणार आहेत. त्याच बरोबर आगामी काळात पुण्याला अधिक वेळ देण्याबरोबरच पुणे दौऱ्यात शाखाध्यक्षांच्या घरी जेवण करणार असल्याचे सांगून राज यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. 


हे पण वाचा, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठलवाडीचे 'विठ्ठल मंदिर' आषाढी एकादशीला बंद


या दरम्यान शहरातील आठही मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांशी राज संवाद उपक्रमाअंतर्गत संवाद साधला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सेनापती बापट रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या बैठकांमध्ये राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधला. आगामी निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतलेे. प्रभागाध्यक्ष पद रद्द करून शाखाध्यक्ष व उपविभागाध्यक्ष पद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वागस्कर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.