खडकवासला धरणातून मुठा पात्रता पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Khadakwasla-released-a-handful-of-qualified-water-from-the-dam-Alert-to-riverside-villages


पुणे: खडकवासला धरण क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे खडकवासला धरण आज पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता असून संध्याकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे महापालिकेने दिला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत असल्याने खडकवासला धरण आज पूर्ण क्षमतेने भरले. आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 2466 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे.

हे पण वाचा, पुण्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू, मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच



मुळशी धरण व टेमघर धरण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे धरणे भरली नसली तरी धरणाच्या खालील भागातही अधिक पाऊस झाल्याने खडकवासला धरणात पाण्याची अवाक वाढली. 


हे पण वाचा, नांदेड फाट्यालगतच्या दुतर्फा १०० वर्ष जुन्या वडांच्या झाडांवर महानगरपालिकेची कुऱ्हाड


खडकवासला धरणात वेगानं पाण्याची आवक होत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आज संध्याकाळी धरणातून मुठा पात्रता पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. 'खडकवासल्या'वरील तीनही धरणे अजून भरलेली नसल्याने विसर्ग तुलनेने कमी असेल, तरीही आपण सर्वांनी काळजीच घेतलेली बरी, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

हे पण वाचा,

इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रमुख शहरामध्ये सरकारी व खाजगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार – अजित पवार
न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.