इतिहासात पहिल्यांदाच भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा, शिवलिंग पाण्याखाली

 

For-the-first-time-in-history-Bhimashankar-temple-is-surrounded-by-flood waters-Shivling-under-water

भीमाशंकर: राज्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस धो धो कोसळत आहेत. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गेल्या २४ तासांपासून भिमाशंकर परिसरात तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.


हे पण वाचा, खडकवासला धरणातून मुठा पात्रता पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बारा जोतिर्लिंगापैकी भिमाशंकर मंदिराच्या जीर्नोधारणाचे काम सुरु असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळून पाणी मंदिरात आलं आहे.


Bhimashankar Shivling Photo, Bhimashankar Photo, Shivling Under Water


हे पण वाचा, पुण्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू, मात्र खडकवासला परिसरात पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच

मंदिराच्या बाजुच्या डोंगरातून पुराच्या पाण्याचा लोट येत असल्यामुळे मंदिरात पाणी जमा झालं आहे. पुणे भिमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच  भिमाशंकरचे शिवलिंग पाण्याखाली गेलं आहे. 

हे पण वाचा,

इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रमुख शहरामध्ये सरकारी व खाजगी चार्जिंग सुविधा उभारण्यात येणार – अजित पवार
न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत
सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या अतिउत्साही लोंकावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.